शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

CoronaVirus राज्य सरकारचा कोरोनाशी असा सुरू आहे लढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 06:52 IST

मंत्रालयात सचिव, अधिकाऱ्यांची लगबग : सर्व यंत्रणा अहोरात्र सज्ज, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारीही व्यस्त

अतुल कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारी कार्यालयांना सुटी आहे, त्यामुळे मंत्रालयात कोणी येत नसले तरी विविध विभागाचे सचिव, प्रधान सचिव, मुख्य सचिव, अनेक अधिकारी दररोज मंत्रालयात येत आहेत. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाशी लढा देत सरकार अनेक पातळ्यांवर काम करत आहे. विविध विभागीय कार्यालयांमध्ये तेथील आयुक्त यात गुंतलेले आहेत. अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीही अहोरात्र याच कामात आहेत. डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट व पोलिसांप्रमाणेच अन्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यासाठी झटत असल्याचे दिसून येते.

कोणत्याही मोठ्या संकटात महसूल, गृह व आरोग्य हे तीन विभाग सर्वप्रथम कामाला लागतात. कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्यावेळी विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन चालू होते. त्यावेळी हा फैसाव इतका वाढेल असे वाटत नसल्याने विधिमंडळात हस्तांदोलनही हसण्यावर नेण्याचा, गमतीचा विषय बनले होते. मात्र अधिवेशन लवकर संस्थगित झाले नाही, तर सगळी यंत्रणा अधिवेशनाच्या प्रश्नोत्तरांत गुंतून पडेल असे स्पष्टपणे सांगण्यात आल्यानंतरही ते १४ मार्चपर्यंत सुरू राहिले. त्यानंतरच प्रशासन गतीमान झाले. सुरुवातीचे काही दिवस जशा बातम्या येत होत्या, जशी माहिती समोर येत होती, तसे निर्णय होत होते. टप्प्याटप्प्याने घोषणा होत होत्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शहरी शाळा बंद केल्या. राज्यात लॉकडाऊनही जाहीर झाले. त्यानंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केले.

रुग्ण संख्या वाढत असल्याचे लक्षात येताच अनेक ठिकाणांहून मास्क, पीपीई कीट यांची मागणी वाढू लागली. १४ मार्चला राज्यात फक्त तीन लॅब होत्या. भीती होती, एवढ्या कमी लॅबमध्ये तपासणी होणार कशी? या लॅबना केंद्र सरकार मान्यता देत असते. राज्याने लॅबची मागणी लावून धरली आजच्या घडीला सरकारी १६ व खाजगी १० अशा २६ लॅब सुरु आहेत. तपासण्यांची संख्या ३०० ते ४०० वरून ५५०० वर गेली आहे.सर्व यंत्रणांना दिशा देण्याचे काम मंत्रालय, मुंबई महापालिका आणि विविध शहरांतील स्थापन केलेल्या छोट्या छोट्या कंट्रोल रुममार्फत सुरू आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या