शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:16 IST

Prakash Mahajan Criticize Sanjay Raut: विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारला आहे. 

मुंबई - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.

शिंदेसेनेवर खोक्यांचे आरोप करणाऱ्या उद्धवसेना आणि राऊत यांच्यावर प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली.  यावेळी प्रकाश महाजन म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक किती पैसे देऊन फोडले, त्यासाठी कोणत्या गुजराती कंत्राटदाराकडून पैसे घेतले, अशी विचारणाही प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्याकडे केले. खोक्याची भाषा बोलणाऱ्यांना पैशांशिवाय काही दिसत नाही, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली.

संजय राऊत २५ वर्षे खासदार असताना त्यांनी मराठी माणसासाठी केलेली किमान पाच कामे दाखवावीत, असं आव्हानही प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना दिलं. एकनाथ शिंदेंवर आरोप करणारे राऊत हे खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारे दलाल आहेत, असा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी पदयात्रा करणाऱ्या दिवंगत चिंतामण रुईकर या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला उद्धव ठाकरे यांना वेळ मिळाला नाही. मात्र याच रुईकर कुटुंबासाठी घर बांधून देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले, असेही महाजन यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना द्यायचे माहीत आहे तर ठाकरेंना घ्यायचे माहित आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

तसेच महायुतीत कोणतीही कुरबुरी नाही, तिन्ही भाऊ मजबुतीने सरकार चालवत आहेत, असे महाजन म्हणाले. मुंबई तोडणार याच गोष्टीवर मागील ३० वर्ष ठाकरे राजकारण करत आहेत. गुजरातची प्रगती बघायला राज ठाकरे स्वत: गेले होते. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईवर त्यांचे प्रेम नाही तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे, अशी टीका महाजन यांनी केली.  दरम्यान, परळीमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी गट स्थापन केला आहे, असे महाजन म्हणाले. छत्रपती संभाजी नगरात मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटे देणाऱ्या अंबादास दानवे यांनी केले. एमआयएमच्या मतांवर दानवे विधान परिषदेवर गेले होते, अशी टीका महाजन यांनी दानवेंवर केली.

English
हिंदी सारांश
Web Title : How much commission to seat Thackeray in MVA?: Mahajan to Raut

Web Summary : Prakash Mahajan questions Sanjay Raut about the commission received for bringing Uddhav Thackeray into power with Congress-NCP after the 2019 elections. Mahajan also accused Raut of being a broker in Delhi and questioned his contributions to Marathi people.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना