शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:28 IST

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत.

जम्मू - जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवलं आहे. याठिकाणी फारूख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सनं ४१ जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसनं ६ जागा जिंकल्या. भाजपाने जम्मू काश्मीरात २९ जागा जिंकल्या असून पीडीपीने ४ आणि अपक्ष ७ आमदार निवडून आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५० वर्षापासून सक्रीय असलेल्या शिवसेना संघटनेने पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. 

महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे उमेदवार उतरवले होते. निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ०.३ टक्के मते तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ०.५ टक्के मते मिळाली आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरात निवडणुका घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ९ उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढले होते.

जम्मू काश्मीरात ठाकरेंच्या उमेदवाराला किती मते मिळाली?

डोडा वेस्ट मतदारसंघ - उमेदवार टिळक राज शान - मते १६२जम्मू वेस्ट मतदारसंघ - उमेदवार मिनाश्री चिब्बेर - मते १२६कालाकोट मतदारसंघ - उमेदवार राकेश कुमार - मते १२६बिश्नाह मतदारसंघ - उमेदवार जय भारत - मते ४७५जसरोटा मतदारसंघ - उमेदवार राजेश कुमार - मते १०४रामनगर मतदारसंघ - उमेदवार राज सिंग - मते ७१४उधमपूर ईस्ट मतदारसंघ - उमेदवार साहिल गंडोत्रा - मते ३९७ उधमपूर वेस्ट मतदारसंघ - उमेदवार संजीव कुमार - मते १७०भदरवाह मतदारसंघ - उमेदवार विनोद कुमार - मते १६५

भाजपानं रचला इतिहास

कलम ३७० हटवण्याचा मुद्दा पुढे करत जम्मू काश्मीरात भाजपानं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी केली. मागील निवडणुकीत या राज्यात भाजपानं २५ जागा जिंकल्या होत्या, मात्र यंदाच्या निवडणुकीत या जागांमध्ये वाढ झाली आहे. भाजपानं यावेळी २९ जागांवर विजय मिळवला आहे. त्याशिवाय पक्षाच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने भाजपा मतदारांच्या संख्येत वाढ होतानाचे चित्र दिसून येत आहे. २००८ साली भाजपाला १२.४५ टक्के मते मिळून ११ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर भाजपाच्या मतांमध्ये वाढ झाली. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी २२.९८ टक्के झाली त्यावेळी जागांच्या संख्येतही दुप्पट वाढ पाहायला मिळाली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाjammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा