2014च्या विधानसभा निवडणुकीत कुणी जिंकल्या होत्या किती जागा?... संपूर्ण निकाल एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 17:07 IST2019-09-21T13:10:40+5:302019-09-21T17:07:17+5:30
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती.

2014च्या विधानसभा निवडणुकीत कुणी जिंकल्या होत्या किती जागा?... संपूर्ण निकाल एका क्लिकवर
पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका अनेक अर्थांनी वेगळ्या ठरल्या होत्या. देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ - तब्बल २५ वर्षं टिकलेली मैत्री - अर्थात भाजपा-शिवसेना युती या निवडणुकीआधी तुटली होती. त्यामुळे सर्व मोठ्या निवडणुका एकत्र लढवणारे दोन मित्र वेगळे लढले होते. त्याचवेळी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडीची घडी बसू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनीही स्वबळावर निवडणूक लढवली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती.
असं होतं पक्षीय बलाबल
भाजपा - १२२
शिवसेना - ६३
काँग्रेस - ४२
राष्ट्रवादी काँग्रेस -४१
अपक्ष - ७
एमआयएम - २
बहुजन विकास आघाडी - ३
शेकाप - ३
मनसे - १
सपा - १
राष्ट्रीय समाज पक्ष - १
भारिप बहुजन महासंघ - १
माकप - १
मुंबई (एकूण जागा - ३६)
भाजपा - १५
शिवसेना - १४
काँग्रेस - ५
एमआयएम,सपा - १
ठाणे-कोकण (एकूण जागा - ३८)
भाजपा - ७
शिवसेना - १५
राष्ट्रवादी - ८
काँग्रेस - १
शेकाप - २
बविआ - ३
सपा, अपक्ष - प्रत्येकी १
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा - ७०)
भाजपा - २४
शिवसेना - १३
काँग्रेस - १०
राष्ट्रवादी - १९
शेकाप, अपक्ष, मनसे, रासप - प्रत्येकी १
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा - ३५)
भाजपा - १३
शिवसेना - ७
काँग्रेस - ७
राष्ट्रवादी - ६
माकप, अपक्ष - प्रत्येकी १
मराठवाडा (एकूण जागा - ४६)
भाजपा - १५
शिवसेना - ११
काँग्रेस - ९
राष्ट्रवादी - ८
एमआयएम - १
अपक्ष - २
विदर्भ (एकूण जागा - ६३)
भाजपा - ४५
शिवसेना - ३
काँग्रेस - १०
राष्ट्रवादी, भारिप - प्रत्येकी १
अपक्ष - २