शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा?; राज्यपालांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:08 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही.

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील संघर्ष वाढत चालला असून विमान प्रवासावरून आज पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. खासगी कार्यक्रमासाठी सरकारी विमान कसे वापरता येईल, असे शिवसेनेने म्हटले आहे, तर ‘आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार हा खासगी दौरा कसा काय असू शकतो?’ असा सवाल राज्यपालांनी केला.राज्यपालांना सरकारी विमान नाकारल्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, मला त्याची कल्पना नाही. सकाळपासून मी जनता दरबारात आहे. नेमके काय झाले याची माहिती घेऊन सांगतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यपालांना विमान प्रवास नाकारण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमतात. राज्यपालांना कुठे जायचे असेल तर ते सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहितात, त्यानंतर विभागाकडून आदेश काढला जातो. राज्यपालांकडून आजच्या प्रवासाबाबत आधीच पत्र पाठविले होते. मुख्यमंत्र्यांपर्यंतही हे पत्र पोहोचले; तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके अहंकारी सरकार मी पाहिले नव्हते. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळाले पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ म्हणाले, विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी १२ नावे राज्यपालांकडे पाठवली, ती मंजूर केली नाहीत याबद्दल आम्ही बोललो तर भाजपने आघाडीच्या नावाने बोंब करणे चुकीचे आहे. बाकी मुख्यमंत्री आणि राज्यपाल कार्यालय ओपन माइंडेड आहेत, त्यामुळे षडयंत्र वगैरै काही बोलू नका.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChagan Bhujbalछगन भुजबळ