मुंबई : होमिओपॅथीचा अभ्यास करणाऱ्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार द्यावा की देऊ नये, यावरून भाजपच्या दोन डॉक्टरआमदारांमधील मतभिन्नता विधानसभेत सोमवारी दिसून आली. याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसारच सरकार निर्णय घेईल, असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. भाजपचे डॉ. तुषार राठोड हे ॲलोपॅथीचे डॉक्टर, तर याच पक्षाचे दुसरे आमदार डॉ. संजय कुटे हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राठोड यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स करून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास अनुमती देण्यास विरोध दर्शविला. दुसरीकडे शेकडो गावे, तांडे, पाड्यांवर एकही एमबीबीएस डॉक्टर नाहीत, कोणतीही पॅथी ही लहानमोठी नसते.
निदान व उपचार पद्धती वेगळी असतानाही...सर्वांचा मुळाधार हा आयुर्वेदातच आहे, असे सांगत डॉ.संजय कुटे यांनी डॉक्टरांच्या कमतरतेवर आंतरपॅथीची प्रॅक्टिस हा उपाय आहे, असे सांगितले. भाजपचेच अतुल भोसले यांनी मात्र विरोध दर्शविला.ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीतील निदान व उपचाराची पद्धत पूर्णत: वेगळी आहे, केवळ वर्षाच्या अभ्यासक्रमावर साडेपाच वर्षे ‘एमबीबीएस’चा अभ्यासक्रम करणाऱ्यांच्या समकक्ष ‘बीएचएमएस’ना नेऊन ठेवणे योग्य नाही, असे डॉ. तुषार राठोड म्हणाले.
३३ संस्थांमध्ये सोयत्यावर, राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले की, साडेपाच वर्षांचा ‘बीएचएमएस’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना एक वर्षाचा ब्रिज कोर्स केल्यानंतर मर्यादित स्वरूपात ॲलोपॅथी उपचाार करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ८ हजार डॉक्टरांनी नोंदणी केली.३३ संस्थांमध्ये हा एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. हा तीनशे तासांचा अभ्यासक्रम आहे. मात्र, ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी त्यास विरोध दर्शविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाच्या निकालानुसार राज्य सरकार निर्णय घेईल.