शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकतात? उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 23, 2015 09:25 IST

सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३  - सरकार बदललं तरीही काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडे कसे फडकताता असा सवाल विचारत पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन याच सरकारने पाकचे शेपूट कापलं पाहिजे अस ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडल आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील मुलाखतीमधून उद्धव यांनी पाकिस्तान, शेतकरी कर्जमाफी , अच्छे दिन अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले. 

पाकिस्तानकडे गमावण्यासारखं काहीही नाहीये, त्यांच्या देशात सावळा गोंधळच चालू असल्याचे उद्धव म्हणाले. त्यामुळे 'पाकिस्तानने अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिलेली असताना सरकारनेही त्यांना जशास तस उत्तर द्यायला हवे असे सांगत राष्ट्रहिताशी कोणतीही तडजोड न करता पाकिस्तानशी मुकाबला करा' असा सल्ला उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. तसेच काश्मीरमध्ये असलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षासोबत असलेल्या भाजपाच्या युतीबाबतही उद्धव यांनी सवाल उपस्थित केला आहे. 'राज्यात येऊन युतीचे राजकारण पुरे करा असं सांगणा-या भाजपाध्यक्षांना पाकधार्जिण्या पक्षासोबत युती कशी चालते' असा खोचक प्रश्न विचारत या अनाकलनीय युतीचं गणित समजत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. 
या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारने जनतेला दिलेल्या 'अच्छे दिना'च्या वायद्याची आठवण करून देतानाच ' लोकांना फसवता येणार नाही, अशी टीकाही केली आहे. तसेच लोकांना मोदींकडून मोठ्या अपेक्षा असून जनतेचा विश्वास तुटू न देण्याचा व कामाचा वेग वाढवण्याचा सल्लाही सरकारला दिला आहे. 
राज्यातील शेतक-यांना कर्जमुक्तीच्या मुद्यावरही उद्धव यांनी या मुलाखतीत भाष्य केले आहे. ' शेतक-यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत.  माफी ही गुन्हेगारांना दिली जाते, त्यामुळे  कर्जमाफी द्यायला शेतकरी गुन्हेगार वाटले काय? असा सवाल विरोधकांना विचारत ' शेतक-याला कर्जमुक्त तर केल पाहिजेचं आणि त्याने पुन्हा कर्ज काढल्यास ते कर्ज फेडण्याची ताकद त्याला दिली पाहिजे' अशी भूमिकाही उद्धव यांनी मांडली.