शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'ती' बाटली नेमकी आली कुठून?; ऐका जितेंद्र आव्हाडांच्याच तोंडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 21:54 IST

दहा रुपयांच्या शिवभोजनाचा आस्वाद घेताना बाजूला मिनरल वॉटरची बाटली असलेला आव्हाड यांचा फोटो व्हायरल झाला होता

ठाणे: शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत असतानाचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फोटोत १० रुपयांच्या थाळीसोबत मिनरल वॉटरची बाटली दिसत असल्यानं अनेकांनी आव्हाड यांना ट्रोल केलं. यावर जितेंद्र आव्हाड यांनी आज खुलासा केला. या फोटोमागची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली. 'आपलं महानगर' वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'मी २६ जानेवारीला शिवभोजन थाळी केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी काही लोकांनी पाण्याची बाटली दाखवली. ती बाटली मी घेतलेली नव्हती. हॉटेलचे मालक बिस्लेरीच्या रिकाम्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन हॉटेलमध्ये वापरतात. मलादेखील जुन्याच बाटलीतून पाणी भरुन देण्यात आलं होतं. पण मनसेच्या अमेय खोपकरांनी बिस्लेरीचा फोटो टाकला आणि मग त्यावरुन ट्रोलिंग सुरू झालं,' असं आव्हाड यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ट्रोलिंगबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. सध्या ट्रोल नावाची नवी आर्मी तयार झाली आहे. पण सामाजिक व्यवस्थेसाठी ही गोष्ट चांगली नाही, असं आव्हाड म्हणाले.तंत्रज्ञानाचा वापर समाज सुधारणेसाठी करायचा की समाजात मानसिक विकृती पसरवण्यासाठी, असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. 'आज ज्या प्रकारचे मिम्स तयार केले जातात, तसे विकृत प्रकार याआधी कधीही झालेले नव्हते. त्यामुळेच अनेक वक्ते त्यांचे शब्द जपून वापरतात. कारण बोलणं एकदा रेकॉर्ड झालं की दुसऱ्या दिवशी त्यावरुन वाद होऊ शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या या विकृतीचा तरुणाईनं विचार करणं आवश्यक आहे,' असं आव्हाड यांनी म्हटलं.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडshiv bhojnalayaशिवभोजनालयSocial Mediaसोशल मीडियाMNSमनसे