पुणे - राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती मंगळवारपासून लागू केली जाणार आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रांत सरासरी ५.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे.
रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून, मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे. ३१ मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात ५६ हजार कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे. रेडिरेकनर दर वाढीची शक्यता असल्याने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दस्त नोंदणीसाठी सर्वच कार्यालयांत गर्दी झाली होती.
रेडिरेकनरमधील वाढ (%)ग्रामीण क्षेत्र ३.३६ प्रभाव क्षेत्र ३.२९नगर परिषद – नगरपंचायत ४.९७महापालिका (मुंबई वगळता) ५.९५मुंबई महापालिका ३.३९ राज्याची सरासरी ३.८९
तीन वर्षे रेडिरेकनरचे दर स्थिर होते. यंदा वाढ करण्यासाठी २०२२ ते २०२४ पर्यंतच्या दस्त नोंदणीची माहिती घेण्यात आली. त्याची सरासरी लक्षात घेऊन वाढ प्रस्तावित करण्यात आली. गेल्या वेळेसपेक्षा ही वाढ तुलनेने कमीच आहे.- रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, पुणे