शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स सुरक्षा ‘रामभरोसे’

By admin | Updated: December 19, 2014 00:55 IST

विदेशी पाहुण्यांची वर्दळ असताना उपराजधानीतील अनेक पॉश हॉटेल्समध्ये पाहिजे तशी चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. दंडुका हातात घेतलेले प्रवेशद्वारावरचे दोन गार्ड म्हणजेच हॉटेलची सुरक्षा, असे समीकरण अनेक

धक्कादायक वास्तव : धोक्याची घंटा दुर्लक्षितनागपूर : विदेशी पाहुण्यांची वर्दळ असताना उपराजधानीतील अनेक पॉश हॉटेल्समध्ये पाहिजे तशी चांगली सुरक्षा व्यवस्था नाही. दंडुका हातात घेतलेले प्रवेशद्वारावरचे दोन गार्ड म्हणजेच हॉटेलची सुरक्षा, असे समीकरण अनेक हॉटेल प्रशासनाने केले आहे. त्यामुळे ही ‘रामभरोसे सुरक्षा’ चिंतेचा विषय ठरली आहे.सिडनीमधील ‘थरारक ओलिस नाट्या’नंतर सुरक्षेचा मुद्दा सर्वत्र चर्चेला आला आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात दोन डझनावर पॉश हॉटेल्स आहेत. यातील वर्धा मार्ग, रामदासपेठ, सीताबर्डी, सदर, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील हॉटेल्समध्ये विदेशी पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. यातील चार ते सहा हॉटेल्स सोडले तर इतर हॉटेल्समधील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे आहे. येथील प्रवेशद्वारावर कडक ‘सॅल्युट’ ठोकणारे गार्ड आढळतात. परंतु बहुतांश हॉटेलमध्ये बॅग तपासणारे स्कॅनर नाहीत. अनेक हॉटेल्समधील मागच्या भागातून सहजपणे आतमध्ये जाता येऊ शकते; सोबत स्फोटके, घातपाताचे साहित्यही सहज नेता येऊ शकते. माहीत असूनही याकडे हॉटेल प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. हा दुर्लक्षितपणा ‘ओलिस नाट्या’सारख्या भयावह धोक्याला आमंत्रण ठरू शकते. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्षहॉटेलच्या आत आणि बाहेरची सुरक्षा व्यवस्था चांगली ठेवा, पार्किंगवरही विशेष लक्ष ठेवा. येणाऱ्या- जाणाऱ्यांवर लक्ष ठेवा, प्रत्येकाची नोंद घ्या, संशयास्पद व्यक्तीची तातडीने पोलिसांना माहिती द्या, अशा सूचना हॉटेल प्रशासनाला पोलिसांकडून वारंवार दिल्या जातात. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. अनेक हॉटेलच्या बाहेर सीसीटीव्ही नाहीत. सुरक्षेच्या नावाखाली केवळ सिक्युरिटी गार्ड उभा दिसतो. त्यामुळे पाहुणा बनून आलेल्या दहशतवाद्याकडून हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्याचा तसेच ओलिस ठेवण्याचा धोका नाकारता येत नाही. या धोक्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे हॉटेल्स प्रशासनाला वेळोवेळी सांगण्यात येते. आम्ही वेळोवेळी तपासणी करतो. पोलीस आपल्यापरीने खबरदारीचे सर्व उपाय करतात. काय आहे, काय नाही, ते उघड करण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती उद्भवल्यास ती निपटून काढण्यासाठी नागपूर पोलीस सक्षम आहेत.कौशल किशोर पाठकपोलीस आयुक्त नागपूर