मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 18:20 IST2025-03-23T18:19:51+5:302025-03-23T18:20:07+5:30

सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते.

Horrific accident in Madhya Pradesh! Two female doctors from Maharashtra mumbai area die, car overturns | मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली

मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात फोरलेन हायवेवर भीषण अपघात झाला. यामध्ये अर्टिंगा कार पलटून कारमधील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार डॉक्टर जखमी झाले आहेत. 

हे सर्व डॉक्टर एकाच कारमधून तीर्थयात्रेसाठी निघाले होते. अयोध्येला जाऊन आल्यानंतर ते उज्जैन महाकालेश्वर मंदिराकडे जात होते. यावेळी लुकवासा पोलीस ठाणे क्षेत्रात शिवपुरी-गुना हायवेवर त्यांची कार अनियंत्रित झाली, यामुळे ती पलटी मारत पुलावरून खाली कोसळली. दहा दिवसांपूर्वी हे सर्व डॉक्टर तिर्थयात्रेसाठी गेले होते. 

डॉ. अतुल आचार्य हे कार चालवत होते. कवासा बायपासवर त्यांचे कारवरील नियंत्रन सुटले. अपघाताची माहिती मिळताच कोलारस पोलीस ठाण्याची मदत आली आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. डॉ. अतुल आचार्य  हे भिवंडीचे असल्याचे सांगितले जात आहेत. सकाळी आठ वाजता हा अपघात झाला आहे. 

जखमींमध्ये डॉ. उदय जोशी (६४) रा. दादर, डॉ. सुबोध पंडित (६२) रा. वसई, डॉ. अतुल आचार्य (५५) रा. भिवंडी आणि डॉ. सीमा जोशी (५९) यांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये अतुल आचार्य यांची पत्नी डॉ. तन्वी आचार्य (५०) व सुबोध पंडित यांची पत्नी डॉ. नीलम पंडित (५५) यांचा मृत्यू झाला आहे. नीलम  यांना हॉस्पिटलमध्ये नेत असताना मृत्यू झाला तर तन्वी यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. 

Web Title: Horrific accident in Madhya Pradesh! Two female doctors from Maharashtra mumbai area die, car overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.