राज्यातील पोलिसांचा सन्मान; ५४ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 05:30 AM2020-01-26T05:30:21+5:302020-01-26T05:30:44+5:30

जासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने कर्तबगार पोलिसांची नावे जाहीर करण्यात आली.

Honor of the police in the state | राज्यातील पोलिसांचा सन्मान; ५४ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदक जाहीर

राज्यातील पोलिसांचा सन्मान; ५४ अधिकारी, अंमलदारांना पोलीस पदक जाहीर

Next

मुंबई : राज्य पोलीस दलात शौर्यपूर्ण, उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ५४ अधिकारी, अंमलदारांना राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. राज्य राखीव दलाच्या प्रमुख अर्चना त्यागी, अप्पर महासंचालक (प्रशिक्षण व खास पथक) संजय सक्सेना, एटीएसमधील समन्वयक उपायुक्त धनंजय कुलकर्णी, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले आदींचा यात समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह विभागाच्या वतीने कर्तबगार पोलिसांची नावे जाहीर करण्यात आली.

महाराष्टÑ पोलीस दलातील चौघांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्टÑपती पोलीस पदक तर अनुक्रमे ४० व १० जणांना गुणवत्तापूर्ण सेवा व शौर्यपूर्ण कार्याबद्दल गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबईतील १० हून अधिक अधिकारी, अंमलदारांचा समावेश आहे.
राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झालेल्या अर्चना त्यागी या राज्य राखीव दलाच्या प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्या १९९३ च्या आयपीएस बॅचच्या अधिकारी असून, त्यांच्याच तुकडीतील व पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण व खास पथकाचे अप्पर महासंचालक संजय सक्सेना यांनाही या पदकाने सन्मानाने गौरविण्यात आले आहे.

पदक घोषित झालेल्या अन्य अधिकारी, अंमलदारांची पदक, पदनिहाय नावे अशी :
राष्टÑपती पोलीस पदक विशेष सेवा : साहाय्यक आयुक्त शशांक सांडभोर (वरळी विभाग) व साहाय्यक फौजदार वसंत साबळे (कोरेगाव पोलीस स्टेशन, सातारा).
पोलीस शौर्यपदक : उपायुक्त समीरसिंग साळवे, अप्पर अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मिथुन जगदाळे, कॉन्स्टेबल सुरपत वड्डे, आशिष हालमी, विनोद राऊत, नंदकुमार आंग्रे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हामित डोंगरे.
पोलीस पदक गुणवत्तापूर्ण सेवा : धनंजय कुलकर्णी (अधीक्षक समन्वयक, दहशतवाद विरोधी पथक), नंदकुमार ठाकूर (उपायुक्त, सशस्त्र विभाग, वरळी), अतुल पाटील (अप्पर आयुक्त, मोटर परिवहन, मुंबई), साहाय्यक आयुक्त स्टिवन अ‍ॅन्थोनी (एटीएस, मुंबई), नंदकिशोर मोरे (विशेष शाखा -१, मुंबई), निशिकांत भुजबळ (सिडको, औरंगाबाद), चंद्रशेखर सावंत (पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला), वरिष्ठ निरीक्षक गजानन काब्दुले (खार, मुंबई), मुकुंद पवार (विशेष शाखा-१, सीआयडी, मुंबई), निरीक्षक : मिलिंद टोटरे (एसीबी, नागपूर), सदानंद मानकर (वाचक शाखा, अकोला), संभाजी सावंत (प्रशिक्षण केंद्र, तुरुची, सांगली), केमोझ इराणी (गुप्त वार्ता विभाग, मुंबई), नीलिमा अराज (अमरावती), इंद्रजीत कराळे (गुप्तवार्ता विभाग, ठाणे), गौतम पाठारे (औरंगाबाद), सुभाष भुजंग (जालना), सुधीर दळवी (मालाड पोलीस ठाणे, मुंबई), किसन गायकवाड (तुर्भे वाहतूक नियंत्रण शाखा, नवी मुंबई), उपनिरीक्षक : जमील इस्माईल सय्यद (राखीव दल, औरंगाबाद मुख्यालय), मधुकर चौगुले (गगनबावडा, कोल्हापूर), साहाय्यक फौजदार : भीकन सोनार (जळगाव), राजू अवताडे (अकोला), शशिकांत लोखंडे (गुप्त वार्ता विभाग, मुंबई), हवालदार : अशपाकअली चिस्थिया (नक्षलविरोधी पथक, गडचिरोली), वसंत तराटे (एन.एम. जोशी मार्ग, मुंबई), रवींद्र नुल्ले (उजळाईवाडी वाहतूक चौकी, कोल्हापूर), महेबुबअली सय्यद (नाशिक पोलीस नियंत्रण कक्ष), साहेबराव राठोड (स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा), दशरथ चिंचकर (पुणे ग्रामीण), लक्ष्मण टेंभुर्णे (गडचिरोली), बट्टुलाल पांडे (नागपूर शहर), विष्णू गोसावी (नाशिक ग्रामीण), प्रदीप जांभळे (एटीएस, पुणे), चंद्रकांत पाटील (जळगाव), भानुदास जाधव (विशेष शाखा -१, मुंबई), नितीन मालप (राज्य गुप्त वार्ता विभाग, मुंबई), रमेश शिंगटे (वाचक, उत्तर नियंत्रण कक्ष, मुंबई), बाबूराव बिºहाडे (राज्य गुप्त वार्ता विभाग, नाशिक) व संजय वायचळे (नाशिक शहर).

Web Title: Honor of the police in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस