Maharashtra Cabinet Expansion Marathi: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्षांचे जवळपास ४० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, महायुती सरकारचे खातेवाटप झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृह खात्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह होता. पण, गृह आणि महसूल खाते भाजपकडेच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना आग्रही, भाजपकडेच राहणार गृह खाते
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृह खात्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या नेत्यांकडून याबद्दल माध्यमांना अनेकवेळा माहिती दिली गेली. शिवसेनेचा आग्रह खातेवाटपात मान्य झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे महसूल खातेही भाजपकडेच राहणार आहे.
आजतकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, शिवसेनेची नजर असलेले गृह खाते भाजपकडेच राहणार आहे. त्याचबरोबर महसूल, जलसंपदा आणि शिक्षण ही खातीही भाजपने स्वतःकडेच ठेवली आहेत. या खात्याची जबाबदारी कोणावर असेल, हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्पष्ट होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला नगर विकास, गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, परिवहन, पर्यटन, तंत्रज्ञान, मराठी भाषा आणि एमएसआरडीसी ही खाती मिळणार आहेत.
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ, सहकार आणि क्रीडा या महत्त्वाच्या खात्यांसह इतरही काही खाती मिळणार आहेत.
भाजपचे संभाव्य मंत्री
1) चंद्रशेखर बावनकुळे2) नितेश राणे 3) शिवेंद्रराजे भोसले 4) चंद्रकांत पाटील 5) पंकज भोयर6) मंगलप्रभात लोढा 7) गिरीश महाजन 8) जयकुमार रावल 9) पंकजा मुंडे10) राधाकृष्ण विखे पाटील11) गणेश नाईक12) मेघना बोर्डीकर13) माधुरी मिसाळ14) अतुल सावे15) आकाश फुंडकर16) अशोक उईके17) जयकुमार मोरे18) संजय सावकारे19) आशिष शेलार