शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 11:25 IST

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली.

ठळक मुद्देदेशमुखांच्या पोलीस सुरक्षा गार्डचं बुधवारी अपघातात झालं निधनअनिल देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी पोलीस अंमलदार संजय नारनवरे हे सुरक्षा गार्ड म्हणून तैनात होते. परंतु त्याचं अपघातात निधन झालं. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करत त्यांना श्रद्घांजली वाहिली आहे. "माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे," असं म्हणत अनिल देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यासोबत संजय नारनवरे यांचा फोटोही शेअर केला आहे.  पोलीस अंमलदार संजय नारनवरे हे अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री त्यांचं अपघाती निधन झालं. नांदगाव फाटा येथे त्यांच्या बाईकला एका ट्रकनं जोरदार धडक दिली. यात नारनवरे यांचा मृत्यू झाला. या घटनेंतर अनिल देशमुख यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिसnagpurनागपूर