शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्मावत’ला संरक्षण देणार : गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 03:14 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून ‘पद्मावत’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहांना संरक्षण देणे, ही राज्य शासनाची जबाबदारी आहे, असे सांगत हा चित्रपट राज्यात प्रदर्शित होणार असल्याचे गृहराज्यमंत्री दिलीप केसरकर यांची मंगळवारी स्पष्ट केले.सरकारने चित्रपटगृह मालक आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा केली असून चित्रपट शांततेत प्रदर्शित व्हावा, यासाठी सरकार लक्ष घालेल, असे सांगितले आहे. आता चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही, याचा निर्णय चित्रपटगृह मालकांना घ्यायचा आहे. तसेच प्रदर्शनादरम्यान, पुरेसा पोलीस बंदोबस्त असेल, असेही असे केसरकर यांनी सांगितले.पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पद्मावतच्या प्रदर्शनास विरोध दर्शवित हा चित्रपट प्रेक्षकांनी बघू नये, कारण त्यात इतिहासाचा विपर्यास केला आहे व राणी पद्मावतीची चुकीची- वाईट प्रतिमा उभी केली आहे, असे म्हटले आहे. केसरकर याबाबत म्हणाले की, रावल स्वत: राजपूत समाजाचे आहेत. त्यांनी व्यक्त केलेले मत वैयक्तिक आहे. सरकार म्हणून चित्रपटाच्या प्रदर्शनास आम्हाला संरक्षण द्यावेच लागेल. नागरिकांनी संयम बाळगावा.निर्माते करबुडवेसंजय लीला भन्साळी प्रोडक्शन्सच्यावतीने पन्हाळा परिसरात मसाई पठारावर पद्मावतचे चित्रीकरण मार्च २०१७ मध्ये करण्यात आले होते़ याप्रकरणी कोल्हापूर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व वनविभाग यांच्याकडून घेतलेली परवानगीची अटही पाळलेली नाही, तसेच २० दिवसांच्या चित्रीकरणाचे एक लाख ९१ हजार रुपये वैध शुल्क न भरता केवळ तीन दिवसांचे २८ हजार रुपये शुल्क भरले आहे़ याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी नंदुरबारमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली़मनसेचा पाठिंबासेन्सॉर बोर्डाची परवानगी आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला होणारा विरोध चुकीचा आहे. करणी सेनेने चित्रपटाच्या विरोधात घेतलेली भूमिका चुकीची आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईसह महाराष्ट्रात ‘पद्मावत’च्या प्रदर्शनासाठी मनसे सज्ज असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस आणि चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी मंगळवारी दिला.बंदीसाठी जलआंदोलन‘पद्मावत’ चित्रपटावर देशभरात बंदी घालावी, या मागणीसाठी शिंदखेडा (जि. धुळे) तालुक्यातील जुने कोळदे येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारपासून जलआंदोलन सुरू केले आहे. लेखी हमी प्रशासनाने दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तापी नदीपात्रात सुरू झालेल्या जलआंदोलनात राजपूत समाजासह दोंडाईचा परिसरातील हिंदु संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीPadmavatपद्मावत