राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 14:30 IST2020-09-25T14:29:19+5:302020-09-25T14:30:10+5:30
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली.

राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी
शिरोळ : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली.
लोकशाहीतील सगळे संकेत पायदळी तुडवून केंद्र सरकारने संसदेमध्ये विधेयक मंजूर केले. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संपविणारे हे विधेयक असून केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करु शकणार नाही. भविष्यात तुमच्या कार्पोरेट कंपन्यांच्या काचा असतील मात्र आमच्या हातात दगड असतील. हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली. शिरोळ येथे तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या वतीने विधेयकाचा निषेध करण्यात आला.