शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

होळीलाही नाही एसी डबल डेकर

By admin | Updated: January 26, 2015 04:58 IST

मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करत कोकणवासियांच्या दिमतीला आणलेल्या एसी डबल डेकर ट्रेन प्रवास्यांच्या थंड प्रतिसादामुळे चार महिन्यापासून वापराविना पडून राहिली आहे

मुंबई : मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करत कोकणवासियांच्या दिमतीला आणलेल्या एसी डबल डेकर ट्रेन प्रवास्यांच्या थंड प्रतिसादामुळे चार महिन्यापासून वापराविना पडून राहिली आहे. मनमानी पद्धतीने आकारण्यात येणाऱ्या तिकीट शुल्कामुळे प्रवास्यांनी पाठ फिरविल्याने देखभाल व दुरुस्तीच्या निमित्याने ती लोअर परळ वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी त्यासाठी जागा नसल्याने कांदिवली स्थाानकाजवळ बेवारस्याप्रमाणे उभी आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या शिमग्यावेळी ती कोकणवासियांना उपलब्ध होणार नाही.२0१४ मध्ये कोकणवासियांसाठी एसी डबल डेकर ट्रेन मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवात सुरु करण्यात आली. मात्र मागणीनुसार तिकिटांत वाढ होणारी प्रिमियम योजना लागू केल्याने कोकणवासियांनी त्याकडे अक्षरश: पाठ फिरवली. त्यामुळे या ट्रेनला प्रवाशांनी प्रतिसाद देण्यात यावा, अन्यथा ही ट्रेन मध्येच बंद केली जाईल, अशाप्रकारचे अजब पत्र कोकण रेल्वेकडूनही काढण्यात आले. त्यानंतर दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रिमियम म्हणून चालविण्यात आली. मात्र दिवाळीत जाणाऱ्या कोकणवासियांची संख्या फारच कमी असल्याने या ट्रेनला अल्प प्रतिसाद मिळाला. या दोन सणासुदीत ट्रेन धावल्यानंतर तीला लोअर परेल वर्कशॉपमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाठवण्याचा निर्णय झाला.कुर्ला ते सीएसटी दरम्यान डबल डेकर ट्रेनसाठी जागाच नसल्याने ही ट्रेन लोअर परेल वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.दोन महिन्यांपूर्वी ही ट्रेन विरार येथे उभी ठेवली होती. त्यानंतर कांदिवली येथे आणल्यानंतर तेथून लोअर परेल वर्कशॉपमध्ये नेण्यात येणार होती. मात्र वर्कशॉपमध्येही या ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी जागा नसल्याने ही ट्रेन अद्यापही वेटिंग लिस्टवर असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे वर्कशॉपमध्ये यावर काम सुरु झाल्यानंतर साधारपणे एक ते सव्वा महिना बाहेर येण्यास लागेल, असेही अधिकारी म्हणाला. ही ट्रेन बाहेर आल्यानंतर पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर किंवा दक्षिणेत या ट्रेनच्या डब्यांची विभागणी करण्यावर विचार केला जात आहे.