शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण; बुलेट ट्रेनच्या दुसऱ्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:23 IST

palghar bullet train Project: मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/ पालघर/डहाणू : मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले. मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. 

पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एकूण ७ बोगदे असून, मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-६ हा दुसरा बोगदा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बोगदा ४५६ मीटर लांबीचा असून रुंदी १४.४ मीटर आहे. बोगद्याच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांद्वारे खोदकाम केले जाते, जे जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त मानले जाते. हे काम अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित बोगद्यांचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात खासदार हेमंत सवरा यांनी पालघरमधील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पालघर हा देशातील वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे. जिल्ह्यातून हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन), डीएफसीसी (डेसिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) आणि देशातील सर्वात मोठे ‘वाढवण बंदर’ असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत, असे खा. सवरा म्हणाले.

२७.४ किमीचे बोगदे

प्रकल्पाच्या संपूर्ण ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये २७.४ किलोमीटरचे बोगदे आहेत, यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पात आठ डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी अंदाजे ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते बीकेसी ५ किमी भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता.

रेल्वे प्रकल्पांचा धडाका

बोरिवली ते विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. विरार ते डहाणू ३ ऱ्या आणि ४ थ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. पालघर रेल्वेस्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास होत आहे. वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारले जाणार आहे., २०१४ नंतर महाराष्ट्राला वर्षाला सरासरी २३,००० कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. यावर्षी महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एका महिन्यात दुसऱ्यांदा डोंगरी बोगद्याचे काम पूर्ण होणे ही एक मोठी उपलब्धी आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा बिलीमोरा ते सुरतदरम्यान सुरू करणार असून महाराष्ट्रातील टप्पा देखील लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री 

बोगद्यांच्या कामाची सद्यस्थिती

बोगदालांबी (मीटर)प्रगती (%)शेरा
एमटी १८२०१६%-
एमटी २२२८०%काम सुरू व्हायचे आहे
एमटी ३१,४०३४१%-
एमटी ४१,२६०३२%-
एमटी ५१,४८०३७%भुयारीकरण पूर्ण
एमटी ६४५४४७%भुयारीकरण पूर्ण
एमटी ७४१७२९%-

पालघर हा सर्वांत वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनत आहे. गेल्या काही वर्षांपासून बरीच विकासकामे सुरू आहेत आणि बुलेट ट्रेनच्या डोंगरी बोगद्याच्या प्रगतीने त्याच्या वैभवात भर घातली आहे.- हेमंत सावरा, खासदार, पालघर

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar Achieves Milestone: Second Bullet Train Tunnel Successfully Completed!

Web Summary : Palghar marked a milestone with the successful completion of the second bullet train tunnel. The 456-meter MT-6 tunnel, built using advanced technology, was finished in 12 months. Palghar is rapidly developing with projects like the bullet train and Dedicated Freight Corridor.
टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनpalgharपालघर