पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण; बुलेट ट्रेनच्या दुसऱ्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:23 IST2026-02-04T10:17:48+5:302026-02-04T10:23:26+5:30

palghar bullet train Project: मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले.

Historic moment for Palghar district; Work on the second tunnel of the bullet train successfully completed! | पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण; बुलेट ट्रेनच्या दुसऱ्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण!

पालघर जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण; बुलेट ट्रेनच्या दुसऱ्या बोगद्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ पालघर/डहाणू : मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या डहाणू इथल्या डोंगरामध्ये भुयारीकरण पूर्ण करून यशस्वी ब्रेक-थ्रू करण्यात आले. मंगळवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. 

पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये एकूण ७ बोगदे असून, मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-६ हा दुसरा बोगदा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बोगदा ४५६ मीटर लांबीचा असून रुंदी १४.४ मीटर आहे. बोगद्याच्या भुयारीकरणासाठी न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांद्वारे खोदकाम केले जाते, जे जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त मानले जाते. हे काम अवघ्या १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित बोगद्यांचे काम देखील लवकरच पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कार्यक्रमात खासदार हेमंत सवरा यांनी पालघरमधील रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पालघर हा देशातील वेगाने विकसित होणारा जिल्हा ठरत आहे. जिल्ह्यातून हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन), डीएफसीसी (डेसिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) आणि देशातील सर्वात मोठे ‘वाढवण बंदर’ असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत, असे खा. सवरा म्हणाले.

२७.४ किमीचे बोगदे

प्रकल्पाच्या संपूर्ण ५०८ किमीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये २७.४ किलोमीटरचे बोगदे आहेत, यात २१ किलोमीटर भूमिगत आणि ६.४ किमी पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पात आठ डोंगरी बोगदे बांधले जात आहेत. सात बोगदे महाराष्ट्रात असून एकत्रित लांबी अंदाजे ६.०५ किमी आहे, तर एक ३५० मीटर लांबीचा बोगदा गुजरातमध्ये आहे. ठाणे ते बीकेसी ५ किमी भूमिगत बोगदा सप्टेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाला होता.

रेल्वे प्रकल्पांचा धडाका

बोरिवली ते विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. विरार ते डहाणू ३ ऱ्या आणि ४ थ्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. पालघर रेल्वेस्थानकाचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास होत आहे. वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारले जाणार आहे., २०१४ नंतर महाराष्ट्राला वर्षाला सरासरी २३,००० कोटी रुपयांचा निधी मिळत आहे. यावर्षी महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोटींहून अधिक रकमेची कामे सुरू असल्याचे खासदार डॉ. सवरा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एका महिन्यात दुसऱ्यांदा डोंगरी बोगद्याचे काम पूर्ण होणे ही एक मोठी उपलब्धी आहे. पुढील वर्षी बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा बिलीमोरा ते सुरतदरम्यान सुरू करणार असून महाराष्ट्रातील टप्पा देखील लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. 
अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री 

बोगद्यांच्या कामाची सद्यस्थिती

बोगदालांबी (मीटर)प्रगती (%)शेरा
एमटी १८२०१६%-
एमटी २२२८०%काम सुरू व्हायचे आहे
एमटी ३१,४०३४१%-
एमटी ४१,२६०३२%-
एमटी ५१,४८०३७%भुयारीकरण पूर्ण
एमटी ६४५४४७%भुयारीकरण पूर्ण
एमटी ७४१७२९%-

पालघर हा सर्वांत वेगाने प्रगती करणारा जिल्हा बनत आहे. गेल्या काही वर्षांपासून बरीच विकासकामे सुरू आहेत आणि बुलेट ट्रेनच्या डोंगरी बोगद्याच्या प्रगतीने त्याच्या वैभवात भर घातली आहे.- हेमंत सावरा, खासदार, पालघर

Web Title : पालघर ने रचा इतिहास: बुलेट ट्रेन की दूसरी सुरंग का काम पूरा!

Web Summary : पालघर ने दूसरी बुलेट ट्रेन सुरंग के सफल समापन के साथ एक मील का पत्थर स्थापित किया। 456 मीटर लंबी एमटी-6 सुरंग, उन्नत तकनीक का उपयोग करके 12 महीनों में पूरी हुई। पालघर बुलेट ट्रेन और समर्पित फ्रेट कॉरिडोर जैसी परियोजनाओं के साथ तेजी से विकास कर रहा है।

Web Title : Palghar Achieves Milestone: Second Bullet Train Tunnel Successfully Completed!

Web Summary : Palghar marked a milestone with the successful completion of the second bullet train tunnel. The 456-meter MT-6 tunnel, built using advanced technology, was finished in 12 months. Palghar is rapidly developing with projects like the bullet train and Dedicated Freight Corridor.