शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

त्याच्या डोळस प्रवासाची ‘लिम्का बुक’कडून दखल

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

सातारा : मंद दृष्टी असतानाही निखील शेडगेने घेतली बी.टेकची पदवी

सातारा : निसर्गाची अवदृष्टी आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा यामुळे बालपणापासूनच लाभलेली मंद दृष्टी. मात्र, त्यावर मात करीत आत्मविश्वासाच्या बळावर शालेय जीवनात उज्ज्वल शैक्षणिक कामगिरी केलेल्या आणि मोठ्या जिद्दीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बी.टेक पदवी संपादन करणाऱ्या साताऱ्यातील निखील प्रभाकर शेडगे या युवकाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’नेही दखल घेतली आहे. दोन्ही डोळ्यांच्या सदोष रेटिनामुळे दृष्टीत वैगुण्य असूनही तामजाईनगरमधील या निखीलने केलेल्या या कामगिरीने सातारकरांची मान गौरवाने उंचावली आहे. या यशामुळे अल्पदृष्टी असून, हे यश मिळविणारा भारतातील तो पहिलाच उमेदवार ठरला आहे. या अनोख्या प्रवासाची कहाणी अशी की, वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच निखीलच्या डोळ्यात मोतिबिंंदू असल्याचे निदान झाले होते. त्यावरील उपचारासाठी ठिकठिकाणी त्याचे पालक त्याला घेऊन गेले. मात्र, त्यांना फारसे यश आले नाही. दिवसेंदिवस त्याची दृष्टी अधिकच अधू होऊ लागली. तिसरीत असतानाच एका नामवंत डॉक्टरकडून डोळ्यावरील शस्त्रक्रिया करताना रेटिनास इजा होऊन त्याला डावा डोळा कायमचा गमवावा लागला. मात्र, उजव्या डोळ्यातील लुकलुकत्या नेत्रज्योतींच्या प्रकाशात त्याने ज्ञानार्जन केले.मेडिकल एंटरान्समध्ये तो राज्यात सातवा आला. मात्र अधू दृष्टीमुळे त्याचा एमबीबीएससाठीचा प्रवेश होऊ शकला नाही. मात्र, अशा अडथळ्यांच्या शर्यतीने न डगमगता त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमास तोडीस तोड असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविला. मुंबईतील माटुंगा येथे असलेल्या व्ही.जे.टी.आय. या महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे धडे गिरवले व पहिल्या सात सेमिस्टर यशस्वीपणे पार पाडल्या; परंतु लक्ष्य गाठण्याची त्याची मनिषा पूर्ण होण्यात अनेक गतिरोधक येत होते. त्यात भरीस भर म्हणून शेवटच्या सेमिस्टरवेळी गेल्या वर्षी त्याच्या उजव्या डोळ्यास रेटिनल डिटॅचमेंट उद्भवला. वारंवार झालेल्या शस्त्रक्रियांमुळे खरेतर कोणीही व्यक्ती वैतागली असती आणि मानसिक दृष्ट्या खचली असती. मात्र, हैद्राबाद येथील डॉ. पद्मजाकुमारी राणी यांनी निखीलवरील १५ वी शस्त्रक्रिया यशस्वी करून त्यास नवसंजीवनीच दिली.या शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या त्रासांना सामोरे जात निखीलने ८ वी सेमिस्टरही पूर्ण केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी मेकॅनिकल इंजिनिअर होण्याचा आनंद मिळविला. त्याचे हे यश कौतुकास्पद असेच आहे. (प्रतिनिधी) यशाची घोडदौड कायम... - हत्तीखाना शाळेतील शिक्षिका सुरेखा शेडगे यांचा निखील हा मुलगा. त्याचे वडील कापडविक्री व्यवसायात आहेत. अथक प्रयत्नातून त्याने दहावीला त्याने ९२ टक्के गुण मिळविले व गुणवत्ता यादीत येण्याचा मानही मिळविला. या शिवाय विज्ञान, समाजशास्त्र विषयात प्रथम येऊन डॉ. धिरुभाई अंबानी अ‍ॅवॉर्ड आणि डॉ. जे. डब्लू आयरन पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला. १२ वीच्या बोर्ड परीक्षेतही विज्ञान शाखेतून त्याने यशाची घोडदौड कायम राखली.