Hinganghat Burn Case : मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 13:37 IST2020-02-10T13:36:31+5:302020-02-10T13:37:26+5:30

गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Hinganghat Burn Case: CM should look into home department: Chandrakant Patil | Hinganghat Burn Case : मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे : चंद्रकांत पाटील

Hinganghat Burn Case : मुख्यमंत्र्यांनी गृहखात्यात लक्ष घालावे : चंद्रकांत पाटील

मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.

या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पीडितेच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केले. हिंगणघाटमधील पीडितेचा आज दुर्दैवी अंत झाल्याची बातमी ऐकून मन अतिशय उदास झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची ही स्थिती पाहून मन अतिशय अस्वस्थ होतंय. मुख्यमंत्री उद्धवजींनी गृहखात्यामध्ये लक्ष घालून, महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण आणावं, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून केले आहे. 

गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

Web Title: Hinganghat Burn Case: CM should look into home department: Chandrakant Patil