शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:09 IST

हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

मुंबई- राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच मोर्चात सहभागी होणार आहे. ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा असं म्हणत दोन्ही बंधूंनी मोर्चाची घोषणा केली आहे. येत्या ५ जुलैला हा मोर्चा मुंबईत निघेल. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांसोबतच साहित्यिक, कलाकारांनाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे. त्यात आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे. कुठली भाषा शिकायची हा इच्छेचा प्रयत्न आहे. सक्तीचा नाही. भाजपाचे हे सक्तीचे धोरण आहे. मुलांनी काय शिकायचे याचे स्वातंत्र्य द्या. प्रत्येक गोष्टी सक्ती केली जाते. महाराष्ट्रात सरकारी कामकाज, नोकरी सर्व व्यवहार मराठीतून चालतात ती यायला हवी म्हणून अनिवार्य केली जाते. मला फ्रेंच शिकायचे असेल ते शिकेन, जर्मन शिकेन पण तुम्ही सक्ती का करता? आधीच दफ्तराच्या ओझाने मुलं वाकतायेत. त्यात सक्तीचे विषय लादून त्यांची पुस्तके, वह्या वाढवणार म्हणजे मुलांच्या मेंदूवरचे दडपण वाढणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपा २४ तास फक्त राजकारण करत आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच भाजपाला कुठलेही सामाजिक भान नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री काय बोलत नाही. बैठकीबाहेर सक्ती नको बोलतात, मग बैठकीत मूग गिळून गप्प बसता का? तुमच्या समोर विषय येतात. त्यात चर्चा होते, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर होतो. त्यानंतर वाद झाल्यानंतर तुम्हाला १०-१५ दिवसांनी जाग येते. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्‍यांना पत्र लिहा. हिंदी सक्तीला आमचा विरोध आहे सांगा. मराठी माणसांना वेडे समजता का...आम्हीही मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होणार आहोत. राज-उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आम्हीही मोर्चात सहभागी होणार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. 

दरम्यान, फक्त मुंबई तोडण्याचा डाव नाही तर महाराष्ट्रात सतत संघर्ष कसा पेटेल, लोक एकमेकांशी कसे भांडतील हे पाहिले जात आहे. मंत्रिमंडळातील सहकारी एकमेकांवर दुर्बिण घेऊन बसलेत, लोकांना द्यायला सरकारकडे पैसे नाही. कोण कुठली पूजा करते हे बाहेरून व्हिडिओ पोहचवले जातात. मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारी संघटना असं शिवसेनेचे ब्रीदवाक्य होते, आता सरकारमध्ये बसलेत त्यापलीकडे काही बोलायचे नाही. फक्त गोंधळ घालून दिवस पुढे ढकलण्याचे काम सरकार करतंय, लोकहितासाठी काम करत नाही असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केला. 

टॅग्स :hindiहिंदीmarathiमराठीSharad Pawarशरद पवारRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड