१० वर्षांनी मेळघाटमध्ये आढळली हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे; 'गिधाड संवर्धन' मोहिमेला मोठे यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 08:28 IST2026-02-11T08:28:12+5:302026-02-11T08:28:41+5:30

पिंजऱ्याबाहेर नैसर्गिक पद्धतीने खाद्यपुरवठा १९ डिसेंबर २०२५ रोजी या गिधाडांना त्यांच्या हालचाली, वर्तन आणि जगण्याचा अभ्यास करण्यासाठी जीएसएम व उपग्रह ट्रान्समीटर बसवण्यात आले.

Himalayan Griffon Vultures Found in Melghat After 10 Years; 'Vulture Conservation' Campaign A Big Success | १० वर्षांनी मेळघाटमध्ये आढळली हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे; 'गिधाड संवर्धन' मोहिमेला मोठे यश  

१० वर्षांनी मेळघाटमध्ये आढळली हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे; 'गिधाड संवर्धन' मोहिमेला मोठे यश  

मुंबई - महाराष्ट्रात गिधाड संवर्धन कार्यक्रमात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून, उच्च हिमालयीन भागात आढळणारे आणि स्थलांतर करणारे हिमालयीन ग्रिफॉन गिधाड मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळल्याची माहिती बीएनएचएसकडून देण्यात आली. मेळघाट आणि ताडोबा या दोन्ही भागांतून गिधाडे स्थानिक पातळीवर नामशेष झाली होती. दहा वर्षांनंतर मेळघाटमध्ये हिमालयीन ग्रिफॉन गिधाड दिसणे हे गिधाड संवर्धन कार्यक्रमातील यश मानले जात आहे. 

२००४ पर्यंत महाराष्ट्रातील गिधाडांची संख्या घटली होती. याचे प्रमुख कारण डायक्लोफेनॅकसारख्या काही औषधांचा वापर असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर, वनविभागाने बीएनएचएसच्या सहकार्याने नामशेष झालेल्या गिधाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू केले.  २३ एप्रिल रोजी पिंजोर येथील गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रातून १५ अतिशय संकटग्रस्त लांब चोचीच्या गिधाडांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा रेंजमध्ये हलवले. नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना काही काळ पिंजऱ्यात ठेवण्यात आले.

जीएसएम, उपग्रह ट्रान्समीटर बसवले

पिंजऱ्याबाहेर नैसर्गिक पद्धतीने खाद्यपुरवठा १९ डिसेंबर २०२५ रोजी या गिधाडांना त्यांच्या हालचाली, वर्तन आणि जगण्याचा अभ्यास करण्यासाठी जीएसएम व उपग्रह ट्रान्समीटर बसवण्यात आले. त्यानंतर, २ जानेवारी २०२६ रोजी त्यांना मुक्त सोडण्यात आले. बीएनएचएसकडून पिंजऱ्याबाहेर नैसर्गिक पद्धतीने खाद्यपुरवठा सुरू करण्यात आला आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सोमठाणा रेंजमध्ये नैसर्गिक अधिवासाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते.

मेळघाट हा ऐतिहासिकदृष्ट्या गिधाडांचा बालेकिल्ला राहिला आहे. येथे हे पक्षी पुन्हा भरभराट करतील, अशी आशा आहे. गेल्या महिनाभरात परिसरात त्यांचा वावर सकारात्मक संकेत देतो. त्यातच गेल्या जवळपास आठवडाभरापासून वन्य हिमालयीन ग्रिफॉन गिधाडांसोबत त्यांचे व्यवहार असणे ही उल्लेखनीय बाब आहे. - किशोर रिठे, संचालक, बीएनएचएस 

मेळघाटमध्ये सोडण्यात आलेली गिधाडे वन्य गिधाडांना आकर्षित करत आहेत, हे यश आहे. हिमालयीन ग्रिफॉन गिधाडे या मुक्त केलेल्या गिधाडांसोबत खाद्य खाणे आणि मिसळणे, हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या परिसंस्थात्मक स्वीकारार्हतेचे लक्षण आहे. -भास्कर दास, जीवशास्त्रज्ञ, बीएनएचएस. 

३४ गिधाडांना केले मुक्त 

बीएनएचएसकडून सुमारे ७०० गिधाडांची देखभाल केली जाते. २०२५-२६ मध्ये मेळघाट, पेंच आणि ताडोबा व्याघ्र राखीव क्षेत्रांमध्ये एकूण ३४ गिधाडे मुक्त करण्यात आली आहेत.

Web Title : 10 साल बाद मेलघाट में हिमालयी गिद्ध देखे गए; संरक्षण को बड़ी सफलता

Web Summary : एक दशक बाद, मेलघाट बाघ अभयारण्य में हिमालयी गिद्ध फिर से दिखे, जो गिद्ध संरक्षण प्रयासों की सफलता का संकेत है। डाइक्लोफेनाक के उपयोग के कारण महाराष्ट्र में गिद्धों की आबादी घट गई। वन विभाग और बीएनएचएस द्वारा पुन: परिचय प्रयासों में ट्रांसमीटर लगे गिद्धों को छोड़ना शामिल था। यह सकारात्मक विकास पारिस्थितिक स्वीकृति को इंगित करता है।

Web Title : Himalayan Griffon Vultures Spotted in Melghat After 10 Years

Web Summary : After a decade, Himalayan Griffon vultures reappear in Melghat Tiger Reserve, signaling success for vulture conservation efforts. Maharashtra's vulture population declined due to diclofenac use. Reintroduction efforts by the forest department and BNHS involved releasing vultures fitted with transmitters. This positive development indicates ecological acceptance.