शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वस्त्यांनी पोखरला डोंगर; वन्यप्राणी झालेत बेघर !

By admin | Updated: June 8, 2015 00:51 IST

लोकवस्तीत वाढला वन्यजिवांचा वावर : कुसूर परिसरात बिबट्याचे हल्ले वाढले; ससे, कोल्हा, तरसासह पक्ष्यांनाही निवारा मिळेना

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर, तारुखसह परिसरातील वाड्या-वस्त्या भौगोलिकदृष्ट्या पूर्णत: डोंगरी भागात डोंगरपायथ्यालगत वसल्या आहेत. परिणामी वन्य प्राण्यांचा वावर थेट लोकवस्तीपर्यंत होऊ लागल्याने पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. तर काही वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कुसूर, तारुखसह परिसरातील वाड्या-वस्त्या चारी बाजूंनी डोंगरी भागांनी वेढल्या गेल्या आहेत. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. पूरक दुग्ध व्यवसायाची जोड असल्याने पाळीव जनावरांची संख्याही तुलनेत जास्त आहे. डोंगरी भाग असल्याने येथील शेतजमिनी अत्यल्प व चढ-उताराच्या कोरडवाहू आहेत. काही शेतकऱ्यांनी विहिरींच्या माध्यमातून बागायती शेती करण्याचा प्रयोग केला आहे. गावात जागा कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच जनावरांसाठी कुड मातीचे शेड तयार करून वस्त्या तयार केल्या आहेत. दिवसभर शेतात थांबायचे आणि रात्रीचे मुक्कामाला गावात यायचे, असा शेतकऱ्यांचा दिनक्रम आहे. शेती शिवाराला लागूनच घनदाट झाडीने व्यापलेले संपूर्ण डोंगरी वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आहे. वन्य प्राण्यांना पोषक असे क्षेत्र असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. डुक्कर, वानर, कोल्हा आदी वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान केले जात आहे.तर बिबट्या, लांडगा, कोल्हा, तरस यासारखे हिंस्त्र प्राणी शिवारापासून ते थेट लोकवस्तीमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ले करून फस्त करत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरे मारल्यास वनविभागाकडून पंचनामा करून मदत दिली जात आहे. (वार्ताहर) शेळी, मेंढपाळांची संख्या जास्त...कुसूर, तारुख, कोळेवाडी येथे शेळी आणि मेंढपाळांची संख्या जास्त आहे. जनावरांना चरण्यासाठी डोंगर माथ्यावर शेतकऱ्यांच्या मालकीच्या पडजमिनी आहेत. यामध्ये मेंढपाळांसह पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. यावेळी अनेकदा वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले करून ठार मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आता लोकवस्तीमध्ये घुसून पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. याची वनविभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कऱ्हाड तालुक्यात सर्वात मोठे वनविभागाचे कोळे बिट असून, येथे ९६० हेक्टर वनक्षेत्र आहे. या परिसरात लागून असलेले संपूर्ण वनक्षेत्र गर्द झाडाझुडपाने व्यापली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे सागवान झाडांची लागवड असलेले क्षेत्र म्हणून या भागाची ओळख आहे.डोंगर पायथ्यलगतची गावे आणि लोकसंख्याबामणवाडी, शिबेवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी : १ हजार ३७४वानरवाडी, पवारवाडी - ६१५ तारुख, खडकवाडी - २ हजार १७२ कोळेवाडी, शिंदेवाडी - ३ हजार १०० कुसूर - १८३३डुक्कर, तरसांचाही वावरवस्तीवरील अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळ्या, मेंढ्या, गाई-वासरे, कुत्री, म्हशीचे रेडकू आदी प्राणी मारले आहेत. वनक्षेत्रात बिबट्या, डुक्कर, साळींदर, वानर, ससे, तरस, कोल्हा आदी वन्य प्राण्यांसह विविध जातींच्या पक्षांची संख्या मोठी आहे. बारमाही पाण्याचा स्त्रोतया वनक्षेत्रात काही ठिकाणी बारमाही पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वनविभागकडून पाणवठे बांधण्यात आले आहेत.वन्य प्राण्यांकडून शेतीचे बेसुमार नुकसान होते. भुईमुगाचे पीक घेणे सध्या जिकिरीचे झाले आहे. नुकसान झाल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळते, हे बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. वनविभागाने त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. - बाबासाहेब पवार, शेतकरी (बामणवाडी)आमचे जनावरांचे शेड डोंगर पायथ्याला आहे. जनावरांना चारा आणण्यासाठी आम्हाला दररोज डोंगर पायथ्याच्या शेतात जावे लागते. मात्र, बिबट्याचा वावर वाढल्याने सध्या जनावरे पाळणेही नकोसे झाले आहे.- बाबाजी खाडे,शेतकरी, कसूर