शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:24 IST

मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली.

सोलापूर - माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झालं तर साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांची चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घेण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावली तरीही ग्रामस्थ मतदानावर ठाम होते. 

आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, आम्ही इथं मतदानाची प्रक्रिया पार पाडतोय, परंतु मतदान केल्यानंतर साहित्य जप्त होणार असेल, सगळे विस्कटलं जाणार असेल, त्यातून गोंधळ आणि झटापट होईल. किमान १५०० मतदान होईपर्यंत इथला निकाल येऊ शकत नाही. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदान होऊच द्यायचं नाही, साहित्य घेऊन जायचं यामुळे मतदान थांबवण्यात आलं आहे. येणाऱ्या ८-१० दिवसांत आम्ही प्रांत कार्यालय किंवा जिथे न्याय मागण्याचं ठिकाण असेल तिथे ताकदीने २५ ते ३० हजार लोकांचा आक्रोश पोहचवण्याचं काम करू. यात न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच मारकडवाडीत जे मतदान होते त्यात १४०० मते मला आणि ५०२ मतदान समोरच्याला होणार होते. मी सगळा अभ्यास केला होता, मात्र समोरच्या उमेदवाराला १००३ मतदान दाखवण्यात आले आहे. ईव्हीएममुळे हे झाले आहे. या गावाचा आक्रोश होता, आम्ही दिलेले मत उत्तमराव जानकरांना न होता दुसऱ्याला कसं गेला हा प्रश्न गावकऱ्यांना होता. त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढले. ही निवडणूक घेता येणार नाही असे आदेश काढले. एक मत टाकल्यावर साहित्य जप्त करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली मग न्याय मागायचा कसा असा सवाल आमदार उत्तमराव जानकर यांनी केला. 

दरम्यान, ही प्रक्रिया साधी होती, सगळ्या महाराष्ट्राला ते चित्र जाणार होते. मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह मतदान झालं होते. गावकऱ्यांना आधार देण्यासाठी मी इथं मुक्कामाला होतो. जे इथं घडले ते राज्यात घडलं. जाणीवपूर्वक या मतदानाला विरोध केला गेला. गाव स्वखर्चाने ही प्रक्रिया राबवत होतं, पोलीस बंदोबस्त मागवला नव्हता. प्रशासनाने अडवणूक केली आहे. २० दिवसांनी मते कशी ट्रान्सफर होतात ते दाखवू, या गावकऱ्यांना न्याय देऊ असंही आमदार जानकरांनी सांगितले आहे. उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली.या बैठकीत अशा प्रकारे पोलिसांचा विरोध झाल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. पोलिसांना घाबरून मतदार मतदानाला येणार नाहीत. मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली. त्यामुळे मारकडवाडी येथील बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया झाली नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४malshiras-acमाळशिरसEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदानPoliceपोलिस