उच्चशिक्षित शेतकरीपुत्राची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:45 IST2017-07-19T00:45:47+5:302017-07-19T00:45:47+5:30
शिक्षणासाठी पित्याने घेतलेले कर्ज, त्यानंतर सततची नापिकी यामुळे हैराण झालेल्या वडिलांची अवस्था पाहावली जात नसल्याने उच्चशिक्षित शेतकरीपुत्राने शेतात

उच्चशिक्षित शेतकरीपुत्राची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड (अमरावती) : शिक्षणासाठी पित्याने घेतलेले कर्ज, त्यानंतर सततची नापिकी यामुळे हैराण झालेल्या वडिलांची अवस्था पाहावली जात नसल्याने उच्चशिक्षित शेतकरीपुत्राने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. मनोज नागोराव बारमासे (२६) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
मनोजचे वडील नागोराव बारमासे यांच्याकडे अवघी दीड एकर शेती आहे. शेतीसाठी आधीच त्यांनी कर्ज घेतले होते. त्यात दोन मुलांसह एका मुलीच्या शिक्षणासाठीही त्यांना कर्ज काढावे लागले. दिवसेंदिवस घरची आर्थिक स्थिती खालावत चालल्याने नैराश्यातून त्याने शेतात जाऊन विष प्राशन केले. रात्रभर तो घरी न परतल्याने शोध घेतला असता मंगळवारी त्याचा मृतदेहच आढळला, असे पोलिसांनी सांगितले.