शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 5:14 AM

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

मुंबई : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.१ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीत राहुल फटांगडे याला जमावाने मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी या प्रकरणी चेतन अल्हट (१९), अक्षय अल्हट (२०) आणि तुषार जुंजाळ (१९) यांना अटक केली. त्यांनी अंतरिम जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र असलेले टी शर्ट घातल्याने पोलिसांनी अटक केली. फटांगडेला मारहाण केली, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांकडे पुरावे नाहीत किंवा या तिघांकडून कोणतेही शस्त्र जप्त केलेले नाही. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. भारती डांग्रे यांनी या जामीन अर्जांवर तत्काळ सुनावणी घेणे गरजेचे नाही, असे सांगत सुनावणी पुढील महिन्यात ठेवली. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांनाही अटक केली होती. गेल्या महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टBhima-koregaonभीमा-कोरेगावMurderखूनnewsबातम्या