शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:35 IST

२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती सीबीआयने वाढवावी, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले  आहे. देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने सीबीआयला दिलेल्या आदेशाचा खरा अर्थ काढला, तर प्रत्येक व्यक्तीची यामधील भूमिका शोधा, असा आहे, असे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने म्हटले.

२४ एप्रिल रोजी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ५ एप्रिल रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी करून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला. मार्चमध्ये तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सध्या कारागृहात असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला बार व रेस्टॉरंट मालकांकडून १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

‘आम्ही केवळ वरच्यांच्या आदेशाचे पालन करत होतो, असे म्हणून प्रशासन प्रमुख स्वतः निर्दोष असल्याचा दावा करू शकत नाही. प्रशासनप्रमुखही त्यास तितकाच जबाबदार आहे. सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घ्या, असे आदेश मंत्र्याने दिले असतीलही परंतु, इतक्या मोठ्या पदावर काम करत असलेली व्यक्ती आपले कर्तव्य पार न पाडता केवळ मंत्र्यांच्या आदेशाचे पालन करते?’, असे न्यायालयाने म्हटले.

‘सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा आम्ही करतो. कट रचणारे कोण आहेत, हे आतापर्यंत सीबीआयला समजले असेल, अशी आम्हाला आशा वाटते’, असे न्या. शिंदे यांनी म्हटले. न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १२ जुलैरोजी ठेवली आहे.

‘एकही व्यक्ती सुटणार नाही’- सचिन वाझे हा धोकादायक माणूस आहे, हे माहीत असतानाही त्याला सेवेत रुजू करणाऱ्या समिती सदस्यांचीही नावे आरोपींच्या यादीत हवीत. आम्ही आता कोणाची नावे घेत नाही. कोणी या पोलिसाला १५ वर्षांनंतर सेवेत रुजू करून घेतले, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावर - सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमन लेखी यांनी सांगितले की, कट रचणारे कोण आहेत, हे सीबीआयला समजले आहे.- ‘सीबीआयचा तपास सर्वसमावेशक आहे व त्यातून एकही व्यक्ती सुटणार नाही.- देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीआयकडे देशमुख यांच्याविरोधात पुरावे नाहीत. संपूर्ण एफआयआरमध्ये सीबीआयने देशमुख यांनी पदाचा गैरवापर कसा केला, याबाबत म्हटले आहे. पण पुरावे नाहीत.  

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHigh Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस