अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:05 IST2023-03-24T08:03:54+5:302023-03-24T08:05:54+5:30
परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले.

अनिल परब यांना पुन्हा हायकोर्टाचा दिलासा, दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना उच्च न्यायालयाने या आठवड्यात दुसऱ्यांदा कारवाईपासून अंतरिम दिलासा दिला आहे. परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला गुरुवारी दिले.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांचे खंडपीठ उपलब्ध नसल्याने यांना २० मार्चला दिलेला अंतरिम दिलासा २८ मार्चपर्यंत कायम करण्यात आला. साई रिसॉर्टप्रकरणी आतापर्यंत तीनजणांना अटक करण्यात आली आहे. त्यात सदानंद कदम, जयराम देशपांडे व सुधीर पारदुले हे तिघे अटकेत आहेत. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार असल्याने परबांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.