पॅराग्लायडरच्या घिरट्या
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:17+5:302016-04-26T05:32:17+5:30
वसई-विरार परिसरातील आकाशात सायंकाळच्या सुमारास एक पॅराग्लायडर संशयास्पदरीत्या घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे.

पॅराग्लायडरच्या घिरट्या
विरार : वसई-विरार परिसरातील आकाशात सायंकाळच्या सुमारास एक पॅराग्लायडर संशयास्पदरीत्या घिरट्या घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन कोळी युवा शक्तीने केले आहे.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी समुद्र मार्गाचा वापर केल्याचे अनेकदा उघडकिस आले आहे.वसई-विरार परिसरातील यंत्रणा पाहून हाच मार्ग अतिरेक्यांनी लक्ष करण्याची तसेच त्यासाठी वसईच्या समुद्र किनाऱ्याची टेहेळणी केली जाण्याची शक्यताही त्यामुळे वर्तवण्यात येत आहे.२२ तारखेला सायंकाळी ५ वाजून ५० मिनीटांच्या सुमारास नारंगी, निळे, काळे अशा रंगाचे पॅराग्लायडर आकाशात घिरट्या घालीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी विशेषत:मच्छिमारांनी दक्ष राहून संशयित बोटी, इसम किंवा पॅराग्लायडर आढळून आल्यास नजिकच्या पोलीस ठाण्याला कळवावे,अथवा पालघर पोलीस नियंत्रण कक्ष ०२५०-२५२१००,२५३१०० या क्रमांकावर संपर्क साधवा असे आवाहन कोळी युवा शक्तीचे दिलीप माठक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)