पोलीस महासंचालकपदाची धुरा हेमंत नागराळे यांच्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:41 IST2021-01-08T06:40:50+5:302021-01-08T06:41:26+5:30

केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी जयस्वाल पदमुक्त. महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जयस्वाल यांचे फारसे सख्य नव्हते.

Hemant Nagrale holds the post of Director General of Police | पोलीस महासंचालकपदाची धुरा हेमंत नागराळे यांच्याकडे

पोलीस महासंचालकपदाची धुरा हेमंत नागराळे यांच्याकडे


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीसाठी गुरुवारी पदभार सोडला. त्यामुळे महासंचालकपदाची धुरा ज्येष्ठ आयपीएस अधिकारी 
हेमंत नागराळे यांच्याकडे देण्यात आली असून, दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला. सध्या नागराळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला असून, लोकसेवा आयोगाच्या निवड समितीकडून त्यांची निश्चिती झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल.

महाविकास आघाडीच्या नेत्यांशी जयस्वाल यांचे फारसे सख्य नव्हते. अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना त्यांच्यात मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाण्याला प्राधान्य दिले.

कारकिर्दीचा प्रवास
n हेमंत नागराळे हे १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, गेल्या सव्वादोन वर्षांपासून ते न्यायिक व तंत्रज्ञ विभागाचे (एल अँड टी) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. 
n जयस्वाल यांची ३० सप्टेंबरला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) निवड झाली आहे. 
n त्यांच्या जागी नागराळे यांच्यासह १९८६च्या आयपीएस बॅचचे आयपीएस व होमगार्डचे महासमादेशक संजय पांड्ये यांच्यात स्पर्धा होती. त्यामध्ये राज्य सरकारने नागराळे यांना पसंती दिली.

Web Title: Hemant Nagrale holds the post of Director General of Police

टॅग्स :Policeपोलिस