शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

भूखंड नियमानुसारच मिळाला : हेमा मालिनी

By admin | Published: February 02, 2016 3:46 AM

‘शासकीय नियमांनुसारच माझ्या नृत्य संस्थेला शासनाचा भूखंड मिळालेला आहे. मी तो बळकावलेला असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही,’ असा खुलासा

मुंबई : ‘शासकीय नियमांनुसारच माझ्या नृत्य संस्थेला शासनाचा भूखंड मिळालेला आहे. मी तो बळकावलेला असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही,’ असा खुलासा अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आंबिवली, अंधेरी येथे हेमा मालिनी यांच्या नाट्यविहार कलाकेंद्राला २ हजार चौरस मीटरचा भूखंड अलीकडेच राज्याच्या महसूल विभागाने दिला. कोट्यवधी रुपये किमतीचा हा भूखंड लीजवर केवळ ७० हजार रुपयांत दिला असल्याची बाब माहितीच्या अधिकारात समोर आली होती. यावर खुलासा करताना हेमा मालिनी म्हणाल्या की, ‘मी अजून या भूखंडासाठी एकही पैसा शासनाला दिलेला नाही. त्याची किंमत सरकार किती आकारणार आहे याची मला माहिती नाही. शासन म्हणेल तेवढी रक्कम मी भरेन.’ ‘या विषयाचे राजकारण केले जाऊ नये, एवढीच माझी विनंती आहे. मला भूखंड मिळाल्याचा मुद्दा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय केल्याबद्दल मी आभारी आहे, पण नृत्य हे माझे जीवन आहे आणि नृत्याच्या प्रोत्साहनासाठी संस्था उभारणे हा माझा अधिकार आहे. शासनाने त्यासाठी जमीन द्यावी, याकरिता मी २० वर्षे संघर्ष केला,’ असा दावाही त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)