गारपीटग्रस्तांना लवकरच मदत
By Admin | Updated: December 16, 2014 02:25 IST2014-12-16T02:25:55+5:302014-12-16T02:25:55+5:30
धुळे, जळगाव व नाशिक आदी जिल्ह्यांना अवकाळी पाऊ स व गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६७० हेक्टर नुकसानीचे आकडे आलेले आहेत

गारपीटग्रस्तांना लवकरच मदत
नागपूर : धुळे, जळगाव व नाशिक आदी जिल्ह्यांना अवकाळी पाऊ स व गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६७० हेक्टर नुकसानीचे आकडे आलेले आहेत. परंतु पूर्ण आकडेवारी यावयाची आहे. ती आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सभागृहाबाहेर पत्रकारांना दिली.
संकटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दीड लाख, तसेच मृत जनावरांच्या संख्येनुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. अनुशेषासंदर्भात गठीत करण्यात आलेल्या केळकर समितीचा अहवाल अधिवेशनात चर्चेला यावा , असा प्रयत्न आहे. तालुका निहाय निर्देशांकाची माहिती घेऊ न त्यानुसार अनुशेष दूर व्हावा, यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. यात राज्याच्या कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांवर आधारित मातृभूमी चित्रपट प्रदर्शीत होणार होता. यात शेतकऱ्यांच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो करमुक्त व्हावा अशी मागणी आहे. म्हणून मी तो बघत होतो. परंतु संकटग्रस्त भागाचा दौरा न करता चित्रपट बघत असल्याचा विरोधकांनी आरोप केला. शेतकऱ्यांवर आधारित चित्रपट पाहणे गुन्हा आहे का. असा सवाल त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.