शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरसह राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 6:36 PM

एकीकडे उष्णता वाढत असतानाच आज संध्याकाळी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईजवळील पनवेल, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या शहरांसह, सिंधुदुर्ग, चिपळूण आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला.

मुंबई  - एकीकडे उष्णता वाढत असतानाच आज संध्याकाळी राज्यातील विविध भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुंबईजवळील पनवेल, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर या शहरांसह, सिंधुदुर्ग, चिपळूण आदी भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागा आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळपासून मोठ्याप्रमाणात उष्णता जाणवत असल्याने मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्याचदरम्यान, संध्याकाळी डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरात अचानक अंधारून आले आणि सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू लागला. संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस  बराच वेळ सुरू होता. 

डोंबिवलीत पावसाची सर बरसली  प्रचंड उकाडा असल्याने डोंबिवलीकर हैराण असतानाच शहरात मंगळवारी अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डोंबिवलीकरांसह चाकर मान्यांची एकच त्रेधातिरपीट उडाली. संध्याकाळी अचानक पाच वाजण्याच्या सुमारास आधी प्रचंड धूळधाण झाली, त्यामुळे शहरातील रस्ते धुलिने माखले होते. पावसाला सुरुवात झालेली नव्हती पण तरीही मातीचा सुगंध सर्वत्र पसरल्याने पावसाचा अंदाज ज्येष्ठांनी वर्तवला होता. त्यात संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी पावसाचा शिडकावा झाला, आणि पुढच्या पाच मिनिटात अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावत रस्ते अलेचिंब केले. साधारण 10 मिनिटे पावसाची सर बरसली, संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी पावसाचा जोर ओसरला. पण आकाश ढगाळलेले होते. पावसाची सर बरसली तरीही वातावरणात उष्मा कायम होता. ढगांचा गडगडाट देखील झाला. पावसाचा आणि धूळधाणीमुळे महावितरणने खबरदारीची उपाययोजना घेत वीजपुरवठा खंडित केला होता. स्टेशन परिसर, फडके रोड, फतेह अली, भगतसिंग, मेहता रोड आदी सर्व ठिकाणी वजज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले होते. उद्या बुधवारी अक्षय तृतीया असल्याने व्यवहारात तेजीची अपेक्षा असतानाच अचानक पडलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला. तसेच शहरात होणारे रिक्षा आंदोलनावरही त्याचा परिणाम।झाला. संध्याकाळी उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट सुरू होता.

बदलापूरात सुसाटय़ाच्या वा-यासह अवकाळी पावसाची हजेरी दुपारी 1 वाजता उन्हाचा पारा हा 42 अंशावर असतांना सायंकाळी 5.30 नंतर बदलापूरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा कहर तासभर राहिला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन लग्न सराईमध्ये देखील व्यक्तय आला आहे. गेल्या दोन दिवसांपासुन उन्हाचा पारा चढलेला असतांना आज दुपारी बदलापूरसह अंबरनाथमध्ये 42 अंशाच्या वर उन्हाचा पारा गेला होता. उकाडय़ाने सर्व हैराण असतांना सायंकाळी 5.30वाजता बदलापूरात सुसाटय़ाच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे सर्व जनजिवन विस्कळीत झाले होते. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. तर सर्वात मोठी कोंडी झाली ती लग्न समारंभांची. मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस लग्न चे मुहुर्त असल्याने बदलापूरात अनेक ठिकाणी लग्न समारंभ होते. या पावसामुळे लग्नसमारंभातही व्यत्यय आला आहे. बदलापूरातच्या काह भागात लहान गारांसह काही काळ पावसाने हजेरी लावली होती. मात्र नंतर लागलीच जोरदार सरींसह पाऊस पडल्याने नागरिाकंनी घरी राहणो पसंत केले.  बदलापूरात पावसाने हजेरी लावलेली असतांना अंबरनाथमध्ये मात्र सुसाटाचा वा-याचा सामना करावा लागला. वा-यामुळे सर्वत्र धुळ पसरली होती. सायंकाळी 6 नंतर पावसाच्या हलक्या सरीच पडल्या. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊसdombivaliडोंबिवली