मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मध्य रेल्वे उशिराने
By Admin | Updated: July 1, 2017 08:41 IST2017-07-01T08:41:18+5:302017-07-01T08:41:33+5:30
पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असून सखल भागांत पाणी साचलं आहे

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मध्य रेल्वे उशिराने
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली असून सखल भागांत पाणी साचलं आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वेवरील लोकल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. मुंबईत मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर, पवई, चांदिवली या भागात सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तर कुर्ला, अंधेरी, वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव भागात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. अंधेरी, चकाला, जेव्हीएलआर, हिंदमाता भागात रस्त्यावर पाणी साचलं आहे.
मुंबईसोबत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी पवई तलाव ओव्हरफ्लो झाला होता. त्यात आज दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे पवई तलावाजवळच्या रस्त्यावर तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
Mumbai: Heavy rain in Sion area (earlier visuals) pic.twitter.com/OlEYGntM8X
— ANI (@ANI_news) July 1, 2017
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह देशभरात मान्सूनचं जोरदार आगमन झालं असून जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.