सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागात पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. केडब्ल्यूव्ही एसईआय दरम्यान पूल (क्र.३८९/०२) कुडूवाडी-सेंद्री दरम्यानची जवळील पाण्याची पातळी धोकादायक पातळीपेक्षा जास्त झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे.
कुईवाडी-सेंद्री दरम्यानच्या रेल्वे मार्गालगत असलेल्या नदीचे पाणी हे गर्डरपर्यंत आल्याने रेल्वे प्रशासनाने हानिर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांच्या वेळा व मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत.
गाडी (क्र-२२१०८) लातूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ही नियोजित सुटण्याची वेळ : २३ सप्टेंबर २०२५रोजी रात्री १०:३० वाजता होती. मात्र, ती बदललेल्या वेळेनुसार २४ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे १:३० वाजता सुटेल. त्यामुळे गाडीला १८० मिनिटे उशीर होणार आहे.
गाडी (क्र.१७६१३) पनवेल-नांदेड, ही २३ सप्टेंबर २०२५ रोजी एएनके डीडी कॉर्ड लाईनमार्गे वळवण्यात आली आहे. गाडी (क्र. १७६१४) नांदेड-पनवेल २३ सप्टेंबर रोजी एएनके-डीडी कॉर्ड लाईनमार्गे वळविण्यात आली आहे.