शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मतदानाच्या दिवशीही कोसळणार धो धो पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 21:18 IST

सर्वच प्रमुख पक्षांची घेतला धसका..

ठळक मुद्देगोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यताराज्यात २१ आक्टोबरला मतदान होत असून त्यादिवशीही पाऊस होणार

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे़. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडला असून पुढील दोन दिवसात कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. त्यामुळे राज्यात २१ आक्टोबरला मतदान होत असून त्यादिवशीही पाऊस होणार आहे़.हवामान विभागाने नैऋत्य मोसमी राज्यातून माघारी गेल्याचे जाहीर केले होते़. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यात पाऊस सुरु झाला आहे़. गेल्या २४ तासात सावंतवाडी १००, देगलूर ९६, देवगड ९४, कोल्हापूर १७़८, सोलापूर ३१, रत्नागिरी ११, पणजी ५३ सांगली ७, अहमदनगर ८ मिमी पावसाची नोंद झाली होती़. शनिवारी दिवसभरात राज्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे ११, कोल्हापूर ११, महाबळेश्वर १३, नाशिक ७, मुंबई, सांताक्रुझ ७, अलिबाग ६, औरंगाबाद २, अकोला ५, ब्रम्हपुरी २ मिमी पावसाची नोंद झाली होती़.  

* इशारा : २०  ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, तर गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़ २१ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता २२ व २३ ऑक्टोबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. ़़़़़़़़२० व २१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे़. पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चार जिल्ह्यात २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. तसेच बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात २० व २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़.. अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसVotingमतदानMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019weatherहवामान