शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा धुमाकूळ; पुणे-बंगळुरु महामार्ग शिरोळनजीक केला बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 08:34 IST

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

पुणे - मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर, सांगलीमध्ये अनेक नद्यांना पूर आला आहे. कोल्हापुराच्या दसरा चौकात पूर्णपणे पाणी साचलं आहे. पंचगंगा नदीला पूर आल्याने पुणे-बंगळुरु हायवेवर पाणी आलं आहे. शिरोळनजीक पुलावर पाणी साचल्याने बंगळुरुकडे जाणारी वाहतूक किणी टोलनाक्याजवळ थांबविण्यात आली आहे. 

पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचा फटका बसलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आदी सहा तालुक्यांतील पाच हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगेला पूर आल्याने २०० हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. काही गावांतील विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. 

सांगली, साताऱ्यात पूरस्थितीसांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदीकाठ महापुराच्या मगरमिठीत सापडला आहे. धोकादायक पातळी ओलांडून नद्यांचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने प्रमुख मार्ग बंद होण्याबरोबर हजारो लोकांच्या स्थलांतराचे काम सुरू झाले आहे. १०७ गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली-इस्लामपूर मार्ग बंद झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पूरस्थिती आहे. कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 

२४ जुलै १९८९ रोजी पंचगंगा नदीचे पाणी पंचगंगा रुग्णालयाच्या मारूती मंदिराजवळ आले होते . इथपर्यंत पुराचे पाणी कधीच आले नव्हते.  त्यामुळे महापालिकेने तेथे त्या घटनेची खूण म्हणून एक शिळा लावली. सोमवारी मध्यरात्री त्या ठिकाणी पुराचे पाणी पोहोचले आहे.

तसेच पुरामुळे अनेक अफवांना उधाण आलं आहे. त्यामुळे पूर, पाणी पातळी याबाबत कोणीही अफवा पसरवू नये. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.  तसेच न्यू पॅलेसमागील सन सिटीमध्ये मध्यरात्री पुराचं पाणी घुसलं आहे, 500 हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे पुरात अडकलेल्या लोकांना बचावकार्यसाठी NDRF च्या दोन तुकड्याही शहरात दाखल झाल्या आहेत. 

 

बेळगावच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली

सतत पडणाऱ्या पावसाने पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने व  तवंदी घाटात दरड कोसळल्याने सोमवार मध्यरात्रीपासून वाहतूक रोखण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर व बेळगावच्या दिशेनें जाणारी शेकडो वाहने मार्गावर अडकली आहेत. यमगर्णीनजीक नवीन पुलावर पाणी आल्याने येथे वाहतूक रोखली आहे. 

दरम्यान  तवंदी घाटात दरड कोसळली असून येथेही वाहतूक रोखली आहे. परिणामी यमगर्णी येथे वाहनांच्या रांगा लागल्या असून या मार्गावरून जाणाऱ्या लोकांना बाहेर न पडण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.  यमगर्णी नवीन पुलावर पाणी येण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे यमगर्णी गावातील काही नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. जत्राट येथील नागरिकांनाही स्थलांतरित करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूरkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर