शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाचा इशारा

By admin | Updated: June 15, 2014 02:13 IST

नानौक हे चक्रीवादळ ओमानकडे सरकले असून, त्याची तीव्रता कमी झाली असली तरी दुसरीकडे मान्सून वेगाने आगेकूच करत असल्याने पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल

मुंबई : नानौक हे चक्रीवादळ ओमानकडे सरकले असून, त्याची तीव्रता कमी झाली असली तरी दुसरीकडे मान्सून वेगाने आगेकूच करत असल्याने पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. पुढील चारही दिवस भरतीचे आहेत, त्यामुळे मुंबईकरांनी पुढील चार दिवस समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा शनिवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाने अंतर्गत दक्षिण कर्नाटकचा भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि मध्य-पश्चिम व वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि अंतर्गत कर्नाटकाच्या आणखी काही भागात पुढील २४ तासांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. शिवाय नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर आणि हिमालयालगतचा पश्चिम बंगाल, सिक्कीमचा उर्वरित भाग, गंगेलगतचा पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढील तीन दिवसांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.दरम्यान, कोकण-गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)