शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 05:59 IST

विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही काहिली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एप्रिलमधील दिलासादायक दिवस आता संपले असून, कमाल तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमान मेच्या सुरुवातीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार जाऊ शकतो.

महामुंबईतील अनेक शहरांत वाढलेल्या तापमानाचा ताप अधिक होणार आहे. तो ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आहे.

पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव

शुक्रवारपासून पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभर उष्णता वाढू लागेल. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत १० आणि ११ एप्रिल रोजी हवामान उष्ण आणि दमट राहील. तर पुढील ७ ते १० दिवस पश्चिमी हवामानातील तीव्र बदलांमुळे राज्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 

कुठे किती तापमान? अंदाज काय?

मुरबाड, महाड आणि घाटमाथ्यालगतच्या भागांत शनिवारपासून तापमानाचा पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकतो. खान्देश, सोलापूर, विदर्भ आणि मराठवाड्यात रविवारपर्यंत तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मध्य महाराष्ट्र, कोकणातही तापमान वाढणार आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र, पुण्यासह लगतचे तापमान ३७-३९ दरम्यान राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी वर्तवली.

सोमवारपासून वाऱ्याचा दिशाबदल

सोमवारपासून पुन्हा वाऱ्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात तापमानात थोडेफार चढ-उतार दिसतील. मात्र, मंगळवारपासून तापमान पुन्हा वाढून आधीच्या पातळीवर पोहोचेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Alert: Maharashtra Braces for Scorching Temperatures in Coming Weeks

Web Summary : Maharashtra faces rising temperatures in the coming weeks, with Vidarbha and Marathwada experiencing highs. Mumbai may reach 42°C. Easterly winds will intensify heat. Expect fluctuations near coastal areas, but temperatures will generally remain high.
टॅग्स :Heat Strokeउष्माघातVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाkonkanकोकणMumbaiमुंबई