आज काेकणात येणार उष्णतेची लाट; मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:36 AM2021-03-25T02:36:12+5:302021-03-25T02:36:29+5:30

हवामान खात्याचा इशारा

A heat wave is coming to Kaekana today; The maximum temperature in Mumbai is 38 degrees | आज काेकणात येणार उष्णतेची लाट; मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांवर

आज काेकणात येणार उष्णतेची लाट; मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांवर

googlenewsNext

मुंबई : मार्च महिना संपत आहे तसा कमाल तापमानाचा पारा चढत आहे. बुधवारी कमाल तापमानाने कहर केला असून, मुंबईचे कमाल तापमान थेट ३८.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. 

यंदाच्या मोसमातला आतापर्यंतचा हा उच्चांक असून, वाढत्या उन्हाने मुंबईकर घामाघूम हाेत आहेत. कमाल तापमानाचा तडाखा कायम राहणार असून, २५ मार्च रोजी कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेला चक्रवात आता मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर आहे.  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकणातील तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले. दुपारी ४ नंतरही उन्हाचा तडाखा कायम असल्याचे चित्र होते. याचा फटका नागरिकांना बसतो आहे. 

तापमानवाढीचे कारण काय?
मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने मान्सूनपूर्व म्हणून ओळखले जातात. मार्च महिना संक्रमणाचा महिना ओळखला जातो. आपण हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे जात असतो. तापमानात मोठे बदल होत असतात. गरम आणि शुष्क वारे यांचा हा परिणाम असून उष्णता दबली गेल्याने तापमानात वाढ होते. नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी.  कोकणातल्या शहरांमध्ये तापमान वाढत असून, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे तापत असल्याने तापमान अधिक नोंदविण्यात येते. शिवाय आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढतो, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: A heat wave is coming to Kaekana today; The maximum temperature in Mumbai is 38 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.