‘तो’ गहू खुल्या बाजारातला
By Admin | Updated: June 7, 2015 01:49 IST2015-06-07T01:49:36+5:302015-06-07T01:49:36+5:30
मुलुंड पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडलेला गहू शिधावाटप योजनेतील नसून खुल्या बाजारातील होता, असे स्पष्ट झाल्याचे शिधावाटप अधिकारी सोनाली धांदर्णेकर

‘तो’ गहू खुल्या बाजारातला
मुंबई : मुलुंड पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडलेला गहू शिधावाटप योजनेतील नसून खुल्या बाजारातील होता, असे स्पष्ट झाल्याचे शिधावाटप अधिकारी सोनाली धांदर्णेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
हा गहू मुलुंडमधील काही रेशनिंग दुकानदारांनी काळ्या बाजारात विकण्यासाठी काढल्याचा संशय होता. मात्र हा संशय खोटा ठरल्याचे धांदर्णेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुलुंड पोलीस ठाण्यातून हा गहू रेशनिंग दुकानदार किशोर गणात्रा यांचा असल्याची माहिती माध्यमांना दिली. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट झाले. या प्रकरणी कोणताही गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात झालेला नाही, असे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी सांगितले. या प्रकरणात किशोर गणात्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल ‘लोकमत’तर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.