शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘EVM हॅक करू असे सांगून उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेतले’, सुनील शेळकेंचा भाजपाच्या नेत्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 08:45 IST

Sunil Shelke News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मावळमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान EVM हॅक करून विजय मिळवून देतो, असे आमिष दाखवून भाजपाच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवारांकडून प्रत्येकी २५ लाख रुपये उकळले, असा सनसनाटी आरोप सुनील शेळके यांनी केला आहे. 

मावळमधील एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर हा आरोप केला. ते म्हणाले की, या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवेळी मतदानाच्या तीन चार दिवस आधी हे नेते एका ईव्हीएम हॅक करणाऱ्याला घेऊन आले. यांचे खिसे भरले नाहीत, यांचं पोट भरलं नाही, म्हणून यांनी उमेदवारांकडून पैसे घेतले. ईव्हीएम हॅक करून तुम्हाला विजय मिळवून देतो म्हणून सांगून यांनी एका एका उमेदवाराकडून प्रत्येकी २५ लाख रुपये गोळा केले.

आता या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीदेखील सुनील शेळके यांनी केली आहे. ते म्हणाले की, मी या प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, यासाठी मागणी करणार आहे. भाजपाचे मावळातले नेते आम्ही ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजय मिळवून देऊ असे उमेदवारांना सांगतात , असे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. तसेच या माध्यमातून २५-२५, ३५-३५ लाख रुपये उकळणाऱ्या नेत्यांची चौकशी करा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असेही सुनील शेळके यांनी यावेळी सांगितले.   

English
हिंदी सारांश
Web Title : Sunil Shelke accuses BJP leader of EVM hack scam, extortion.

Web Summary : NCP MLA Sunil Shelke alleges BJP leaders extorted ₹25 lakh from candidates, promising EVM hack victories. He demands a CM investigation into the scam.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५EVM Machineईव्हीएम मशीनNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPuneपुणे