मुंबई/ठाणे : निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे काहीही करू शकतात. मुंबईत केलेले घोटाळे आणि चुकांसाठी त्यांनी स्वत:लाच आसूड मारून घ्यावा, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी चेंबूर येथे केली. तर, घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते आता हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता हंबरडा मोर्चा काढत आहेत, असा जोरदार घणाघात त्यांनी उद्धव यांच्यावर ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना केला. मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिंदे यांनी चेंबूर येथे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते. मात्र, मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. त्यांच्या आरोपांना कामातून उत्तर देत आहोत.
उंबरठा ओलांडत नव्हते, ते हंबरडा मोर्चा काढताहेत घराचा उंबरठा ओलांडत नव्हते, ते हंबरडा मोर्चा काढत आहेत. सत्ता गेली, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता हंबरडा मोर्चा काढत आहेत, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ठाण्यात टीका केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले तरीही, ठाकरे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Thackeray, accusing him of corruption and questioning his recent public appearances. Shinde defended his government's actions, citing infrastructure improvements and farmer support despite Thackeray's criticisms. He stated Thackeray should self-reflect on his failures.
Web Summary : एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे की आलोचना करते हुए उन पर भ्रष्टाचार का आरोप लगाया और उनकी हालिया सार्वजनिक उपस्थिति पर सवाल उठाया। शिंदे ने अपनी सरकार के कार्यों का बचाव करते हुए ठाकरे की आलोचनाओं के बावजूद बुनियादी ढांचे में सुधार और किसान समर्थन का हवाला दिया। उन्होंने कहा कि ठाकरे को अपनी विफलताओं पर आत्मचिंतन करना चाहिए।