शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

एका पायावर तो पळाला १० किलोमीटर...पुण्यातल्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:50 PM

नुकत्याच पुण्यात झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत चर्चा सुरु आहे ती जावेद चौधरी या तरुणाची.

पुणे : जिद्द, चिकाटी हे शब्दही ज्याच्यापुढे फिके पडतील अशा एक तरुणाची ही कथा. नुकत्याच पुण्यात झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत चर्चा सुरु आहे ती जावेद चौधरी या तरुणाची. एका पायाच्या जोरावर जावेदने थोडेथोडके नव्हे तर १० किलोमीटरचे अंतर पार केले आणि त्यानंतर झिंगाट गाण्यावर केलेला जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही जाऊन जावेदची भेट घेतली आणि समोर आला त्याचा असामान्य संघर्ष. 

 जावेद जेमतेम २४ वर्षांचा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे त्याचे मूळ गाव. वडील म्हशीचे तर आई गृहिणी आहे. त्याच्या एकत्र कुटुंबात त्याच्याशिवाय कोणीही विज्ञान शाखेतही प्रवेश घेतलेला नाही. २०१५साली अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेताना त्याचा अपघात झाला आणि त्यात एक पाय काढावा लागला. पण या  आकाशाएवढ्या संकटाला घाबरून जाईल तो जावेद कसला ! त्याने अपघातानंतर शिक्षण पूर्ण केलेच पण बाईक स्टंट, रॅप्लिंगही शिकला. त्याआधी तो प्रवीण असलेल्या नृत्य कलेचे प्रशिक्षण देणेही त्याने सुरु केले. याच काळात त्याची गाठ पडली ती चेअर बास्केटबॉलशी. अपघातापूर्वी या खेळाचे नावही त्याने कधी ऐकले नव्हते. पण आता तो खेळात भारताचे नेतृत्व करणार आहे.आज त्याला त्याचा अपघात दुर्दैव न वाटता आयुष्याचा  महत्वाचा टप्पा वाटतो. आयुष्य संपल्यावरही आपल्याला जर आपली आठवण राहावी असे वाटत असेल तर मेहनत घ्यायलाच हवी असे त्याला वाटते. 

मॅरेथॉनमध्ये धावण्याची त्याची कहाणी तर रंजक आहे. संबंधित संस्थेने त्याला  स्पर्धेविषयी कल्पना दिली. मात्र बास्केटबॉल स्पर्धेमुळे त्याला एकही दिवस सराव करता आला नाही. हे सगळं होऊनही माघार न घेता तो १० किलोमीटर धावला. आज त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकजण त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.आयुष्यात  या मागील तीन वर्षांत घडलेल्या बदलांबाबत तो सकारात्मक दृष्टीने बघतो. 'माणसाचा जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे जे आहे त्यात जास्तीत जास्त जग अनुभवा. थोडीशी मेहनत लागेल पण आयुष्य अधिक सुंदर होईल' हे आपल्या कृतीमागचा मुख्य गाभा असल्याचे सांगताना जावेदचा चेहरा आत्मविश्वासाने लख्ख उजळलेला असतो. 

टॅग्स :PuneपुणेPerson With Disabilityदिव्यांग