शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफांच्या मुलांची न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 12:44 IST

आपल्याविरोधात किंवा वडिलांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसतानाही ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडी आम्हाला अटक करेल, अशी भीती आहे आणि यामागे आमच्या वडिलांना लक्ष्य करण्याचा ईडीचा हेतू आहे, असे हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजीद यांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलांनी कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेच्या भीतीने विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. 

आपल्याविरोधात किंवा वडिलांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसतानाही ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडी आम्हाला अटक करेल, अशी भीती आहे आणि यामागे आमच्या वडिलांना लक्ष्य करण्याचा ईडीचा हेतू आहे, असे हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजीद यांनी अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. विशेष न्यायालयाने ईडीला मुश्रीफांच्या मुलांच्या अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी १६  पर्यंत तहकूब केली. ईडीने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर छापा टाकला आणि तेथील कर्मचाऱ्यांना वडिलांविरोधात जबाब देण्यास भाग पाडले. छापा टाकण्याचा आणि तथाकथित तपासाचा उद्देश सत्य बाहेर काढण्याचा नव्हता किंवा संभाव्य गुन्ह्याचे कोणतेही पुरावे शोधण्याचा नव्हता. परंतु, बँकेने माजी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्यावरून कर्जे दिली आणि ते व्यवहार संशयास्पद आहेत, असे जबाब कर्मचाऱ्यांकडून नोंदवून घेण्याचा ईडीचा हेतू होता. 

बँक कर्मचाऱ्यांची छळवणूक करण्यात आली, तर महिला कर्मचाऱ्यांना मध्यरात्री दोन वाजता कॉल केला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी छळवणूक केल्याबाबत बँक कर्मचारी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तयार आहेत.

सोमय्यांचे आरोप् फेटाळून लावलेगेल्या महिन्यात, ईडीने मुश्रीफ, त्यांच्या कुटुंबाशी संबंधित संपत्तीवर छापा टाकला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुश्रीफांच्या साखर कारखान्यावरही छापा टाकला. सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनुसार, मुश्रीफ गडहिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात झालेल्या १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारात सहभागी आहेत. मात्र, मुलांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफNCPराष्ट्रवादी काँग्रेसCourtन्यायालय