काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा सध्या सुरू आहे. ही पदयात्रा आज वर्धा जिल्ह्यात पोहोचली. या पदयात्रेदरम्यान, पोलिसांकडून सातत्याने पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच माझ्यावर जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान सातत्याने पोलिसांकरवी पाळत ठेवण्यात येत असून माझी हेरगिरी सुरू आहे ! कुठे असतो ? कुठे बसतो ? कुठे राहतो ? किती लोक पदयात्रेत आहेत ? कोण कोण सहभागी आहे ? या गोष्टीपासून तर थेट काय-काय बोलतो ? अशा प्रत्येक क्षणाचे रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. अगदी मीडिया बाईट सुरू असताना पासून ते थेट जेवणाच्या पंगतींपर्यंत. याचा अर्थ काय?, असा सवाल सपकाळ यांनी विचारला.
आम्ही गांधीवाले आहोत निश्चितच घाबरणार नाही हे ते जाणून आहेतच ! मात्र एकंदरित अर्थ काय तर "ये सरकार हमसे डरती है' पुलिसको आगे करती है" माझे सरकारला खुले आव्हान आहे. माझ्यावर जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करा, असे आव्हानही त्यांनी या ट्विटमधून दिले आहे.
Web Summary : Maharashtra Congress chief alleges constant police surveillance during their Constitution Satyagraha Padyatra in Wardha. He challenges the government to file the first case against him under the Public Safety Act, asserting they are not afraid.
Web Summary : महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष ने वर्धा में संविधान सत्याग्रह पदयात्रा के दौरान पुलिस द्वारा लगातार निगरानी रखने का आरोप लगाया। उन्होंने सरकार को चुनौती दी कि वे जन सुरक्षा अधिनियम के तहत उनके खिलाफ पहला मामला दर्ज करें, और कहा कि वे डरने वाले नहीं हैं।