शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन जाधव पोहचले सोनेगाव ठाण्यात

By admin | Updated: December 21, 2014 00:14 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. दुपारी १२ ते २

बयाण नोंदविले : कानशिलात लगावल्याचा इन्कारनागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. दुपारी १२ ते २ असे दोन तास आ. जाधव यांनी ठाण्यात आपले बयाण नोंदविले. हॉटेल प्राईडमध्ये बुधवारी सायंकाळी पो.नि. पराग जाधव यांच्या कानशिलात लगावल्यामुळे आ. जाधव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र, आ. जाधव यांनी कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. कोर्टाच्या आदेशानुसार, आज दुपारी १२ वाजता आ. जाधव आपल्या वकिलांसह सोनेगाव ठाण्यात पोहचले. ठाणेदार प्रकाश शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आ. जाधव यांचे बयाण नोंदवून घेतले. माहिती कळताच एसीपी दंदाळे, एसीपी मनवरे यांनीही पोलीस ठाणे गाठले. एसीपी मनवरे यांनीही नंतर आ. जाधव यांची बाजू ऐकून घेतली. आ. जाधव यांनी आपले बयाण नोंदविताना अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावल्याचाही आ. जाधव यांनी स्पष्ट इन्कार केला, असे पोलीस सांगत आहेत. (प्रतिनिधी)आज पुन्हा हजेरी बयाण नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी आ. जाधव यांना पुन्हा रविवारी दुपारी ठाण्यात येण्यास सांगितले. पोलिसांना मिळालेली तक्रार आणि साक्षीपुराव्याच्या अहवालावरून पोलीस उद्या (रविवारी) आ. जाधव यांचे ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ करणार आहेत. त्यावरून तयार केलेला अहवाल पोलीस २९ डिसेंबरला कोर्टात सादर करतील. प्रसारमाध्यमासमोर चुप्पीदुपारी २ वाजता आ. जाधव पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांनी चुप्पी साधली. कोणत्याच प्रश्नावर ते काहीही बोलले नाही. दरम्यान, त्याच्या वकिलांनी ‘कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही पोलीस ठाण्यात आलो होतो’, असे सांगितले.