Happy New Year 2019 - जाणून घ्या नववर्षात कधीय दसरा, 'दिवाळी' अन् ईद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 10:16 IST2019-01-01T09:08:55+5:302019-01-01T10:16:12+5:30
आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे.

Happy New Year 2019 - जाणून घ्या नववर्षात कधीय दसरा, 'दिवाळी' अन् ईद
मुंबई - जगभरात नववर्षाची धूम दिसायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या मित्र परिवारास, नातेवाईकांस, आप्तजनांना, स्वकीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे. आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, नव्या वर्षात रंगपंचमी, होळी, ईद, दसरा, दिवाळी हे सण कधी आहेत, हे पाहण्याची उत्सुकता आपल्याला आहेच.
आपल्या नव कॅलेंडरनुसार यंदाच्या वर्षातील सणांची यादी, वार आणि दिनांक आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत.
* दिनांक - * सण
15 जानेवारी - मकर संक्रांती मंगळवार
08 फेब्रुवारी - श्री गणेश जयंती शुक्रवार
19 फेब्रुवारी - शिवाजी महाराज जयंती मंगळवार
25 फेब्रुवारी - श्री गजानन महाराज प्रगट दिन सोमवार
20 मार्च - होळी बुधवार
21 मार्च - धुलीवंदन गुरूवार
06 एप्रिल - गुढीपाडवा शनिवार
13 एप्रिल - रामनवमी शनिवार
14 एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार
17 एप्रिल - महावीर जयंती
19 एप्रिल - हनुमान जयंती शुक्रवार
07 मे - अक्षय तृतीया मंगळवार
05 जून - रमजान ईद
16 जुलै - गुरूपौर्णिमा मंगळवार
12 ऑगस्ट - बकरी ईद
15 ऑगस्ट - रक्षाबंधन गुरूवार
17 ऑगस्ट - पारसी नववर्ष
23 ऑगस्ट - जन्माष्टमी शुक्रवार
24 ऑगस्ट - गोपाळकाला शनिवार
30 ऑगस्ट - पोळा शुक्रवार
01 सप्टेंबर - हरतालीका रविवार
02 सप्टेंबर - श्री गणेश चतुर्थी सोमवार
12 सप्टेंबर - अनंत चतुर्दशी गुरूवार
29 सप्टेंबर - घटस्थापना रविवार
08 ऑक्टोबर - दसरा मंगळवार
13 ऑक्टोबर - कोजागिरी पोर्णिमा रविवार
25 ऑक्टोबर - घनत्रयोदशी शुक्रवार
27 ऑक्टोबर - लक्ष्मीपूजन रविवार
29 ऑक्टोबर - भाऊबीज मंगळवार
01 नोव्हेंबर - लाभ पंचमी शुक्रवार
11 नोव्हेंबर - वैकुंठ चतुर्दशी सोमवार
12 नोव्हेंबर - त्रिपुरारी पोर्णिमा मंगळवार
12 डिसेंबर - श्री गुरूदत्त जयंती बुधवार
25 डिसेंबर - ख्रिसमस नाताळ बुधवार
31 डिसेंबर - मंगळवार