शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा ‘बीके’चा पेपर फुटल्याच्या चर्चेने गोंधळ

By admin | Updated: March 10, 2015 04:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा बूक किपिंग अ‍ॅण्ड

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा बूक किपिंग अ‍ॅण्ड अकाउंटसी (बी.के.) विषयाचा पेपर ‘व्हॉटसअ‍ॅप’मार्फत फुटल्याच्या चर्चेने विद्यार्थी आणि पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. चौकशीअंती हा पेपर फुटला नसल्याचा दावा मुंबई मंडळाने केला असून, याबाबतचा अहवाल शिक्षण मंडळाला पाठविण्यात आला आहे. हा पेपर फुटला किंवा नाही, हा निर्णय मंडळामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.राज्यात दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. सोमवारी बारावीचा वाणिज्य शाखेचा बीके हा पेपर होता. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजित वेळेच्या १0 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येते. सकाळी ११ वाजताचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना १0.५0 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात आली. पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर पोस्ट केल्याने सर्वत्र पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. पेपर फुटल्याचे फोन मंडळामध्ये खणखणले. प्रश्नपत्रिकाच व्हॉटसअ‍ॅपवर फिरू लागल्याने मुंबई विभागीय मंडळाने याची चौकशी सुरू केली. व्हॉटसअ‍ॅपवर ११ वाजता पेपर आल्याने मंडळाने हा पेपर फुटला नसल्याचे सांगितले. साडे दहा वाजण्याच्या सुमारास पेपर व्हॉटसअ‍ॅपवर आला असता तर तो फुटला असे समजले असते. परंतु तो परीक्षा सुरू झाल्यानंतर बाहेर आल्याने पेपर फुटला असे म्हणता येणार नाही, असा दावा मंडळाचे सचिव एस. वाय. चांदेकर यांनी केला. (प्रतिनिधी)